भेसळीच्या संशयावरून तासगावात औषध कंपनीवर छापा 

शैलेश पेटकर
Wednesday, 30 September 2020

सांगली : तासगाव येथील सुकमणी मल्टीकेअर प्रायव्हेट लिमिटेड या शक्तीवर्धक औषध कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाचे छापा टाकला.

सांगली : तासगाव येथील सुकमणी मल्टीकेअर प्रायव्हेट लिमिटेड या शक्तीवर्धक औषध कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाचे छापा टाकला. भेसळीचा संशय असल्याने संजीवनी एन्झायम, डायमंड कॅप्सूल किट, एसटीपीएल ग्रोन, हे प्रोटीन कॉन्सन्ट्रेट इत्यादींचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. सुमारे 7 लाख 97 हजार 910 रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सुकुमार चौगुले यांनी दिली. 

अधिक माहिती अशी, की तासगावमधील गोटेवाडी रस्त्यावर राजेंद्र सोपान जाधव यांचे सुकमणी मल्टीकेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. याठिकाणी शक्तीवर्धक औषधे बनवली जातात. सदरचा व्यवसाय अन्न परवाना न घेत व्यवसाय सुरू केले असल्याचे निर्दशनास आले. 

त्यानुसार छापा टाकण्यात आला आहे. त्यांना व्यवसाय बंद करण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे. उत्पादनाच्या लेबलवर काही चुकीचा मजकूर छापला असल्याची शक्‍यता असल्याने सर्व साठा जप्त करुन विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. याचे नुमने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा अधिकारी डी. एच. कोळी, श्री. स्वामी व नमुना सहायक श्री. कवळे यांनी कारवाई केली. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raid on a drug company in Tasgaon on suspicion of forgery