अथणी येथील शासकीय रुग्णालयावर छापा

अथणी येथील शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया व गर्भाशय काढण्यासाठी अधिकारी पैसे उकळत असल्याच्या तक्रारी लोकायुक्त खात्याकडे गेल्या.
Rain on Athani Government Hospital
Rain on Athani Government HospitalSakal
Updated on
Summary

अथणी येथील शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया व गर्भाशय काढण्यासाठी अधिकारी पैसे उकळत असल्याच्या तक्रारी लोकायुक्त खात्याकडे गेल्या.

अथणी - येथील शासकीय रुग्णालयात (Government Hospital) शस्त्रक्रिया व गर्भाशय काढण्यासाठी अधिकारी पैसे उकळत असल्याच्या तक्रारी (Complaint) लोकायुक्त खात्याकडे गेल्या. त्याची दखल घेऊन लोकायुक्त एसपी यशोदा वंटगुडे व डीवायएसपी जी. रघु यांच्या पथकाने अथणी शासकीय रुग्णालयावर बुधवारी (ता. २३) सकाळी ११ च्या सुमारास छापा टाकला.

याबाबत अधिक माहिती अशी, अथणी शासकीय रुग्णालयात २०१९-२०२० कालावधीत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शस्त्रक्रियेसाठी रक्कम उकळल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळेच लोकायुक्त एसपी यशोदा वंटगुडे व डीवायएसपी जी. रघु यांच्यासह पथकाकडून बुधवारी चार तास कारभाराची चौकशी व कागदपत्रांची तपासणी केली. पुढील तपासासाठी तेलसंग, ऐगळीला पथक रवाना झाले. अथणी शासकीय रुग्णालयात अधिकारी रुग्णांची दखल घेत नाहीत. रुग्णांकडून शस्त्रक्रियांसाठी हजारापासून पाच हजारांपर्यंत रक्कम घेतली जात असल्याच्या तक्रारी गेल्याने कारवाई झाली. या वेळी तालुका आरोग्याधिकारी डाॅ. बसगोंडा कागे, स्थानिक पोलिस कर्मचारी उपस्थित होते. एसपी यशोदा वंटगुडे व डीवायएसपी जी. रघू यांनी शासकीय आरोग्य अधिकाऱ्यांक़डून माहिती घेतली. त्यांच्याकडून पुढील तपास होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Red Bull Breaks the Ritual Barrier as Salgare Preserves 202-Year Bendur Tradition
Sangli Anti Corruption Bureau trap
Latest Koyna Dam storage report
MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com