

सांगली : खंडोबाचीवाडी येथील एका पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये सुरू असलेला तीन पानी जुगार अड्डा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकला. याठिकाणी जुगार खेळणाऱ्या नऊ जणांवर कारवाई करून रोकड, मोबाईल, वाहने असा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पलूस तालुक्यात जुगार अड्ड्यावर केलेल्या या मोठ्या कारवाईने खळबळ उडाली होती.