
पलूस : रामानंदनगर (ता. पलूस) येथे रेल्वे प्रशासनाने बापूवाडी झोपडपट्टी बेकायदेशीररीत्या उद्ध्वस्त केल्याने बापूवाडी येथील रहिवाशांनी पुनर्वसनाच्या मागणीसाठी आज सायंकाळी अचानक शहरातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले. अखेर रात्री ९ वाजता प्रांताधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनासमवेत तातडीने उद्या (ता. १४) बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.