माधवनगर रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूल चौपदरी होणार...नविन प्रस्ताव सादर : पृथ्वीराज पाटील यांचा पाठपुरावा 

घनशाम नवाथे
Thursday, 30 July 2020

सांगली-  नांद्रे ते सांगली रेल्वे मार्गावरील माधवनगर रस्त्यावरील चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे चौपदरीकरण तसेच वाढीव बांधकामासाठीचा नवा प्रस्ताव नुकताच राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे. यापूर्वीचा प्रस्तावित पूल अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होईल, त्यामुळे तो रूंद करावा अशी मागणी कॉंग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे हा पूल आता चौपदरी रस्त्यासह विस्तारित स्वरूपात होणार आहे. 

नांद्रे ते सांगली या रेल्वे किलोमीटर क्रमांक 269-967 उड्डाणपूल नं.503 चे नूतनीकरण करून बांधकाम करण्यास रेल्वे विभागाने प्रस्तावित केले आहे. चिंतामणीनगर येथील हा पूल बाहेरून 12 मीटर रुंदीचा तसेच आतून 10.50 मीटर रुंदीचा प्रस्तावित केला होता. परंतु या मार्गावरील मोठी वर्दळ लक्षात घेता हा पूल अपुरा ठरू शकतो. त्यामुळे तिथे तो विस्तारित स्वरूपात करण्यात यावा अशी मागणी श्री. पाटील यांनी केली होती. या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून नवीन प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम मंडळ, कोल्हापूरकडे पाठवलेला आहे. 

नविन प्रस्तावानुसार हा पूल आता फुटपाथसह 14 मीटर रुंदीचा आणि आतून "कॅरेज वे' सह 10 मीटर रुंदीचा होणार आहे. हा रस्ता सांगली-तासगाव-विटा ते मायणी, फलटण, बारामती, अहमदनगर, कुसुंबे, दौंडाईजा असा या राज्य मार्ग क्रमांक 60 म्हणून ओळखला जातो. या मार्गावरील चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचा साखळी क्रमांक किलोमीटर 194/115 असा आहे. या रस्त्यावरील वाहतूक वर्दळ 52 हजार 897 मेट्रिक टन असून पीसीयु (पॅसेंजर कार युनिट) 28 हजार 321 इतका आहे. या रस्त्याची रुंदी तीस मीटर आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला पुलाला जोडणारे मार्ग सोडून चार पदरी रस्ता आहे. त्यामुळे सदरचा पूल चौपदरीकरणासह विस्तारित स्वरूपात पूर्ण करणे आवश्‍यक आहे. 

पुलाच्या बांधकामासाठी 5.67 कोटी रुपये खर्च येणार अपेक्षित आहे. पुलाच्या बांधकामासाठी येणाऱ्या वाढीव खर्चाची शंभर टक्के जबाबदारी घेऊन ती रेल्वे विभागाकडे वर्ग करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयास कळवले आहे. या नव्या प्रस्तावामुळे चिंतामणीनगर येथील पुलाच्या विस्तारीत कामास लवकरच वेग येणार आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway flyover on Madhavnagar road will be four-laned .New proposal submitted: Prithviraj Patil's follow up