railway officials convert passenger train to express for this purpose
railway officials convert passenger train to express for this purpose

रेल्वे आधिकाऱ्यांची शक्कल : यासाठी पँसेंजरला एक्सप्रेस बनवण्याचा डाव

Published on

मिरज (जि. सांगली) : सप्टेबंर महिन्यात सुरू होणाऱ्या रेल्वे गाड्यांसाठी दुप्पट भाडेआकारणीचे रेल्वे बोर्डाचे नियोजन आहे. ही भाडेवाढ थेट करण्याऐवजी सगळ्याच पॅसेजंर गाड्यांना एक्‍सप्रेसचा दर्जा देऊन ही भाडेवाढ प्रवाशांच्या माथी मारण्याचे रेल्वे बोर्डातील काही हुशार आधिकाऱ्यांचे नियोजन आहे. त्यासाठी बोर्डाने रेल्वेच्या सर्व विभागांकडुन अभिप्रायही मागविले आहेत. मिरज रेल्वे स्थानकातुन पहिल्या टप्प्यात सुरू होणाऱ्या चार गाड्यांना ही दुप्पट भाडेवाढ लागु होणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेच्या वरिष्ठांशी रेल्वे बोर्डाचा पत्रव्यवहार सुरू आहे. 

लॉकडाऊन मागे घेतल्यानतंरच्या पहिल्या टप्प्यात रेल्वेच्या देशभरात एकुण दोनशे गाड्या सुरू करण्याचा रेल्वेबोर्डाचा विचार आहे. यामध्ये काही महत्वाच्या लांब पल्ल्याच्या तर बहुसंख्य स्थानिक गाड्यांचा समावेश आहे. मिरज रेल्वे स्थानकातुन सोडण्यात येणा-या मिरज कॅसलरॉक, मिरज परळी, मिरज हुबळी आणि कोल्हापुर पुणे(डेमु), या चार गाड्यांचा समावेश आहे. या सर्व गाड्यांना साध्या पॅसेजंर गाड्यांचा दर्जा असल्याने त्याचे भाडेही तितकेच स्वस्त आहे. पण यापुढे रेल्वेला ही स्वस्ताई परवडेनाशी झाली आहे.

रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी रेल्वेला भाडेवाढीशिवाय अन्य कोणताही पर्याय नसल्याने या भाडेवाढीसाठी रेल्वे बोर्डातील वरिष्ठ आधिका-यांनी पॅसेजंरना गाड्यांना एक्‍सप्रेसचे नाव ऊ्‌ेन या गाड्या पुर्वीप्रमाणेच पळवण्याचा घाट घातला आहे. या सर्व गाड्या पुर्वीप्रमाणेच त्यांच्या नियोजीत मार्गावरील सर्व स्थानकावर थांबतील पण त्यांचे नाव मात्र एक्‍सप्रेसचे राहणार असल्याने भाडेही त्याच प्रमाणात वसुल केले जाणार आहे. त्यासाठी रेल्वे बोर्डातील आधिका-यांनी विभागीय स्तरावरील आधिका-यांचे अभिप्राय मागविले आहेत जो अभिप्राय विभागीय स्तरावरील आधिका-यांनी सकारात्मकच देणे रेल्वे बोर्डाच्या आधिका-यांना अभिप्रेत आहे. त्यामुळे यापुढे रेल्वेचा प्रवासही महागण्याचे संकेत रेल्वेने अशाप्रकारे दिले आहेत. 

भाडेवाढीचा हा नियोजनबद्ध कट 
या देशातील गरीबांसाठी रेल्वे हा प्रवासासाठीचा एकमेव सुरक्षित आणि स्वस्त पर्याय आहे. रेल्वेने श्रीमंत प्रवाशांना ही भाडेवाढ लागु केली तर फारसे वाईट वाटणार नाही. पण पॅसेजंर गाड्याना एक्‍सप्रेसचा दर्जा देऊन दुप्पट भाडे उकळणे हा नियोजनबद्ध कट आहे. मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापिका रेणु शर्मा यांनी याबाबत प्रवासी संघटनांशी चर्चा करुनच अहवाल पाठवावा. अन्यथा या फसवणुकीविरुध्द आंदोलन करण्यात येईल. 

- ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष मिरज रेल्वे प्रवासी संघ, मिरज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com