किसान रेल्वे बुकींसाठी अधिकाऱ्यांची व्यापारी, फळ, भाजीपाला मार्केटला भेट

शंकर भोसले 
Friday, 28 August 2020

किसान रेल्वे खास शेतकरी आणि व्यापा-यांसाठी उपयुक्त असली तरी तिला म्हणावा तितका प्रतिसाद मिरज स्थानकातून अद्यापतरी मिळालेला नाही.

मिरज : किसान रेल्वे खास शेतकरी आणि व्यापा-यांसाठी उपयुक्त असली तरी तिला म्हणावा तितका प्रतिसाद मिरज स्थानकातून अद्यापतरी मिळालेला नाही. गाडीच्या बुकींगसाठी मिरज स्थानकातील अधिका-यांना रेल्वे प्रशासनाने टार्गेट दिल्यामुळे अधिकारी सांगली, मिरजेतील व्यापारपेठा, फळ मार्केट, भाजीपाला मार्केट, कापड पेठा येथे बुकींगसाठी प्रत्यक्ष भेट देत आहेत. बुकींगला अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. हे आकडेवारी सांगते. 

किसान रेल्वे असे नामकरण केलेली गाडी विनावातानुकूलित असल्यामुळे शेतक-यांचा भाजीपाला खराब होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गाडीस म्हणावा तितका प्रतिसाद मिळालेला नाही. किसान रेल्वेतून भाजीपाला, फळ भाज्या, फळे निर्यात करायची असल्यास वातानुकूलित बोगी असणे गरजेचे आहे, असे व्यापारी आणि शेतक-यांचे मत आहे.

पुणे विभागाने दोन बोगी कार्यान्वित केल्या असल्या तरी किसान रेल्वे कोल्हापूरातून गुरूवारी आणि सोमवारी सोडण्याचे नियोजन आहे. गाडीतून जास्तीत जास्त शेतमाल पाठवला जावा म्हणून रेल्वेचे अधिकारी स्वतः मोठे व्यापारी, प्रगतीशील शेतकरी, भाजी मार्केट, फळ मार्केट आणि मिरज एमआयडीसी भागात भेटी देत आहेत. मात्र प्रतिसाद अल्पच राहिला. या गाडीस विना वातानुकूलित बोगी असल्यामुळे पाले भाज्या, फळ भाज्या पाठवण्यास अनंत अडचणी आहेत. त्यामुळे वातानुकूलित बोगी जोडल्यास व्यापा-यांसह शेतक-यांना भाजी पाला पुण्यासह अन्य ठिकाणी पाठवण्यास अडचणी येणार नाहीत. वातानुकूलित बोगीमुळे भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थदेखील पाठवता येणार आहेत. ते दीर्घकाळ टिकणार आहे. 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway officials visit traders, fruit and vegetable markets