तो परत आला राव... काय म्हणायचं या पावसाला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

पावसाने शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. श्रीरामपूर तालुक्‍यातील बेलापूर, ऐनतपूर, अशोकनगर, वडाळा महादेव, खंडाळा, हरेगाव, नाऊर, जाफराबाद, मातुलठाण, निमगाव खैरी, गोंडेगाव, कारेगाव, टाकळीभान या गावांमध्येही हलका पाऊस झाला.

नगर : जिल्ह्याच्या उत्तर भागात श्रीरामपूर, राहाता आणि राहुरी तालुक्‍यात आज सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात हलका, तर काही भागात मुसळधार पाऊस झाला. श्रीरामपूर शहरासह तालुक्‍यात सायंकाळी पाचच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुरवातीला पावसाच्या हलक्‍या सरी कोसळत होत्या. सातच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. 

पावसाने शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. श्रीरामपूर तालुक्‍यातील बेलापूर, ऐनतपूर, अशोकनगर, वडाळा महादेव, खंडाळा, हरेगाव, नाऊर, जाफराबाद, मातुलठाण, निमगाव खैरी, गोंडेगाव, कारेगाव, टाकळीभान या गावांमध्येही हलका पाऊस झाला. काही वेळाच्या विश्रांतीनंतर सातच्या सुमारास पावसाचा जोर वाढला होता. लोणी (ता. राहाता) आणि गावाच्या परिसरात सायंकाळी मुसळधार पाऊस झाला.

राहुरी शहरासह तालुक्‍याच्या काही भागातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. 
जिल्ह्यात बहुतांश भागात आज दुपारपासून ढगाळ वातावरण होते. दरम्यान, या पावसाने गहू, हरभरा, द्राक्षे, तसेच कांदा पिकावर विपरीत परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. पाऊस व ढगाळ वातावरणामुळे थंडीत वाढ झाली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The rain came again