esakal | पावसाची उघडीप, शेतकरी चिंतेत 
sakal

बोलून बातमी शोधा

1farmers_.jpg

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 0.8 मिलिमिटर पाऊस पडला.

पावसाची उघडीप, शेतकरी चिंतेत 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे. खरीप हंगामात 75 टक्केहून अधिक पेरणी झाली आहे. दोन पावसात खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांतील चिंता वाढलेली आहे. पाऊस न पडल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. ढगाळी आणि थोड्याच वेळात पुन्हा ऊन असे गेली आठवडाभरातील चित्र आहे. वारणा धरणात 18.30 टी. एम. सी. पाणीसाठा झाला आहे. 

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 0.8 मिलिमिटर पाऊस पडला. गेल्या 24 तासात व 1 जूनपासून आजअखेर पडलेल्या पाऊस ( मिलिमिटरमध्ये) असा- मिरज 3 (162.2), तासगाव 0.4 (172.1), कवठेमहांकाळ 4.2 (239.9), वाळवा-इस्लामपूर 0.3 (197.1), शिराळा 0.00 (437.3), कडेगाव 0.00 (199.4), पलूस 0.00 (144.3), खानापूर-विटा 0.2 (279.6), आटपाडी 0.00 (169.7), जत 0.00 (104.3). 

वारणा धरणात सकाळी 8 वाजेपर्यंत 18.30 टी. एम. सी. पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 42.83 टी. एम. सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी. आहे. धोम धरणात 6.23 टी. एम. सी, कन्हेर धरणात 3.98 टी.एम.सी, उरमोडी धरणात 5.96 टी.एम.सी. पाणीसाठी आहे. अलमट्टी धरणात 92.86 टी. एम. सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी. एम. सी. आहे. 

सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून कोयना 2167, कण्हेर 24, उरमोडी 150, अलमट्टी 46130 क्‍युसेकने पाणी सोडले जात आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. 

  • कृष्णा पूल कराड 6.5 (45), 
  • आयर्विन पूल सांगली 8.3 (40) 
  • अंकली पूल हरिपूर 8.10 (45.11). 

 
संपादन - शैलेश पेटकर

loading image