देशात पावसाच्या नोंदीत यंदा महाबळेश्‍वर अव्वल

महाबळेश्‍वर - पावसाच्या धारांसह धुक्‍यात लपटलेली महाबळेश्‍वरची बाजारपेठ.
महाबळेश्‍वर - पावसाच्या धारांसह धुक्‍यात लपटलेली महाबळेश्‍वरची बाजारपेठ.
Updated on: 

सातारा - जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे देशात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद नुकतीच झाली आहे. याबाबत द वेदर चॅनेल इंडियानेदेखील नुकत्याच केलेल्या ट्‌विटमध्ये चेरापुंजीपेक्षा महाबळेश्‍वरात अधिक पाऊस असल्याचे नमूद केले आहे. 

सर्वांत जास्त पाऊस पडणारे ठिकाण म्हणून आजपर्यंत मेघालयातील चेरापुंजीची ओळख आहे. गेल्या काही वर्षांत थंड हवेचे ठिकाण म्हणून परिचित असलेल्या महाबळेश्‍वरमध्ये चेरापुंजीपेक्षा अधिक पावसाची नोंद होऊ लागली आहे. त्याबाबतच्या नोंदीतून हे स्पष्ट होत आहे. द वेदर चॅनेल इंडियानेदेखील नुकत्याच केलेल्या ट्‌विटमध्ये महाबळेश्वर येथे चेरापुंजीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याचे नमूद केले आहे. यामध्ये एक जूनपासून नोंदविलेल्यानुसार महाबळेश्‍वरमध्ये पाच हजार ४८६ मिलिमीटर तसेच चेरापुंजी येथे पाच हजार ३४६ मिलिमीटर पाऊस पडल्याचे नमूद केले आहे.

पाऊस पडण्यासाठी भौगोलिक स्थान आणि वातावरणात आवश्‍यक असणारी पोषक स्थिती उपलब्ध व्हावी लागते. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या पर्वतरांगा विशिष्ट रचनेत असल्यामुळे पावसासाठी आवश्‍यक असणाऱ्या ढगांसाठी पोषक स्थिती निर्माण होते. ज्यामुळे पाऊस कोसळण्यास मदत होते. या वातावरणाचा अधिक फायदा महाबळेश्वर आणि परिसराला मिळाला. त्यामुळे महाबळेश्वर पावसाच्या नोंदीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आजच्या (रविवार) पावसाच्या नोंदीनुसार महाबळेश्‍वर येथे पाच हजार ९४९ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी चार हजार ७८ इतकी नोंद होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Sangli ACB trap exposes a ₹50,000 bribe case
Sunil patil and Sonali Avati
Marathi News Esakal
www.esakal.com