सोलापूर : बार्शीत रोलरला बाजूला करत ट्रॅक्टरची बाणावर मात; सोपलांचा पराभव | Election Results

प्रवीण डोके
Thursday, 24 October 2019

बार्शीत चुरशीच्या लढतीत अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत विजयी

बार्शी (सोलापूर) : राज्यात बार्शी विधानसभेची निवडणूक कायमच चुरशीची राहिली असली तरी यावेळी मात्र, अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांचे ट्रॅक्टर चिन्ह आणि अगदी त्यांच्या खाली असलेले रोलर हे चिन्ह यामध्ये मतदारात गोंधळ निर्माण होऊन रोडरोलरला जवळपास दहा हजार मते मिळाली आणि राजेंद्र राऊत यांचा मार्ग बाणापेक्षा रोलरनेच खडतर केलेला पाहायला मिळाला.

प्रत्येक फेरीत मतांचा लीड सातत्याने एकमेकांकडे झुकलेला पाहवयास मिळत होता. या सगळ्यात अखेर अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी विजय खेचून आणला. यामध्ये राजेंद्र राऊत यांना (अपक्ष) 95 हजार 482, दिलीप सोपल (शिवसेना) 92 हजार 406 राजेंद्र राऊत 03 हजार 76 मतांनी विजयी झाले आहेत.

विजयानंतर राऊत म्हणाले, नेहमी प्रमाणे अत्यंत कुटील कारस्थान करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तरीही जनेते मला निवडून दिले. लोलरचा मोठा फरक आम्हाला बसला. बँकेला, शेतकऱ्यांना लुटणाऱ्या, भ्रष्टाचार करणाऱ्याला झेलची हवा खायला लवणारच. आम्ही निवडणूक ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढवली आहे. मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्नाखाली आतापर्यंत काम केले आहे. ते पुढे ही करत राहू. जनेतेने टाकलेल्या विश्वास सार्थ करणार. उपसा सिंचन योजना पूर्ण करणार, 115 साठवण तलावाची निर्मिती आणि जलयुक्तच्या माध्यमातून मोठी कामे ग्रामीण भागासाठी करणार.

शहरातून शिवसेनेचे दिलीप सोपल यांना मतदारांनी लीड दिला. तर ग्रामीण भागातून अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांना लीड दिला. परंतु ग्रामीण भागाच्या भरघोस लीड मुळे राऊत हे 3076 मतांनी निवडून आले आहेत. त्यातच अपक्ष उमेदवार विशाल कळसकर यांना 11427 मते पडली आहेत. यामध्ये ट्रॅक्टर आणि लोलर हे दिसायला सारखे असल्याने आणि त्यातच चिन्ह ही एका खाली एक असल्याने लोलर ला मतदान नजरचुकीने मतदान जास्त झाले. त्यामुळे याचा मोठा फटाका राऊत यांना बसला आला तरही राऊत हे निवडून आले आहेत.

बार्शीत एका बाजूला राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले उमेदवार दिलीप सोपल, भाऊसाहेब आंधळकर आणि भाजपचे राजेंद्र मिरगने यांनी खिंड लढवली तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांच्यासह नगराध्यक्ष असिफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष विश्वासराव बारबोले यांनी खिंड लढवली आहे.

यामध्ये राऊत यांचे योग्य नियोजन, विकासाच्या मुद्द्यांवर प्रचार, कार्यकर्त्यांकडून निकडीचा प्रचार, नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती यामध्ये असलेल्या सत्तेचा कसा विकासासाठी उपयोग केला हे योग्य पद्धतीने जनतेत पोहचवले यामुळे राजेंद्र राऊत यांचा विजय झाला आहे. तर  दिलीप सोपल यांचा गेल्या काही वर्षात ग्रामीण भागाचा तुटलेला संपर्क, योग्य नियोजन नसणे, आर्यन साखर कारखान्याचे शेतकऱ्यांचे उसाचे बिल दिले गेले नाही. प्रचारात मागे यामुळे सोपल यांचा पराभव झाला असल्याचे अनेक राजकीय जाणकारांचे मत आहे.

तसेच गेल्या काही वर्षात आमदारकी नसताना बार्शीतील भुयारी गटार योजनअंतर्गत सुरू असलेले काम, भांगवांत मैदानाचा कायापालट, पीकविमा मिळवून देणे, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी साठवण तलाव निर्मितीचे कामास मंजुरी, शहरातील,ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी सातत्याने पाठ पुरावा, बार्शी नगरपालिका, पंचायत समितीच्या माध्यमातून नागरिकांसाठी योग्य पद्धतीने घरकुल योजना राबवणे, शहरातील उद्यानाचे शुशोभिकरण करणे या अनेक कामांवर राऊत यांनी भर दिला. तर जातीचे राजकारण याचाही मोठा फायदा राऊत यांना यांना झाला आहे. राऊत यांनी विकास कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि त्याला निधी आलाकी ते काम आम्हीच केलेलं आहे, हे म्हणण्यात निव्वळ टाईमपास केला असल्याचे जाणकारांचे मत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajabhau Raut Win Vidhansabha Election in Barshi Constituency