esakal | सांगलीत राजापुरी हळदीला मिळाला इतका उच्चांकी दर...

बोलून बातमी शोधा

turmeric sangli.jpg}

सांगली-  कृषी उत्पन्न बाजार समितीत काल (ता. 23)च्या सौद्यात 21 हजार रुपये उच्चांकी दर मिळाल्यावर आज त्याहून जास्त 24 हजार 100 रुपये प्रतिक्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला. 

सांगलीत राजापुरी हळदीला मिळाला इतका उच्चांकी दर...
sakal_logo
By
घनश्‍याम नवाथे

सांगली-  कृषी उत्पन्न बाजार समितीत काल (ता. 23)च्या सौद्यात 21 हजार रुपये उच्चांकी दर मिळाल्यावर आज त्याहून जास्त 24 हजार 100 रुपये प्रतिक्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला. 

बाजार समितीत हळदीचे सौदे काढले जात असून, गेल्या काही दिवसांपासून दर वाढत असल्याचे चित्र आहे. 16 फेब्रुवारीला झालेल्या सौद्यात सर्वप्रथम 17 हजार 100 रुपये उच्चांकी दर मिळाला. त्यानंतर मंगळवारी (ता. 23) झालेल्या सौद्यात राजापुरी हळदीला प्रतिक्विंटल 21 हजार रुपये दर मिळाला. त्यानंतर आजच्या सौद्यात मेसर्स संगमेश्‍वर ट्रेडर्स या दुकानात झालेल्या हळद सौद्यात शेतकरी रामाप्पा नेमगोंडर (रा. गुरलापूर, जि. बेळगाव) यांच्या राजापुरी हळदीला 24 हजार 100 रुपये प्रतिक्विंटल इतका आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांकी दर मिळाला. ही हळद यू. के. खिमजी यांनी खरेदी केली.

आजच्या सौद्यात हळदीला कमीत कमी सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त 24 हजार 100 रुपये इतका दर मिळाला. तसेच सरासरी दर देखील वाढून 15 हजार 550 रूपये इतका मिळाला. आजच्या सौद्यासाठी अडते, व्यापारी, खरेदीदार, शेतकरी, हमाल, तोलाईदार, हळद सौदे विभागप्रमुख मोहनसिंग राजपूत आदी उपस्थित होते. दरम्यान, बाजार समितीमधील सौद्यात उच्चांकी दर मिळत असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हळद सौद्यासाठी आणावी असे आवाहन सभापती दिनकर पाटील व सचिव एम. पी. चव्हाण यांनी केले आहे.