#Rakshabandhan : रविवार असूनही पोस्टमन आले राख्या घेऊन

अमोल वाघमारे
रविवार, 26 ऑगस्ट 2018

सावळी विहीर (नगर) : रक्षाबंधनासाठी बहिणीने भावासाठी पाठवलेली राखी सणाच्या दिवशी हाती पडावी, यासाठी टपाल खात्याने आज रविवार असुनही घरोघरी टपाल पोहचविले. सुटीच्या दिवशीही दारात पोस्टमनला पाहुन अनेकांनी आनंदाश्चर्य व्यक्त केले. टपाल स्विकारुन त्यात आलेल्या राखीकडे कौतुकाने पाहत अनेक जण पोस्टमनदादाला धन्यवाद देत होते.

रक्षाबंधन रविवारी असल्याने आणि बहिणींनी आपल्या भावासाठी पाठवलेल्या राख्या उशिरा पोहचु नयेत म्हणुन श्रीरामपुर विभागातील सर्व टपाल कार्यालये आज रविवार असुनही सुरु ठेवण्यात आली होती. शिर्डी टपाल कार्यालयात आज सर्व कर्मचारी उपस्थीत होते. पोस्टमनही मोटारीने आलेले साधे टपाल विभागुन राख्यांची बीटनुसार विभागणी करुन वाटप करत होते.

शिर्डी टपाल कार्यालय, सावळीविहीर, लक्ष्मीवाडी, सावळीविहीर फार्म, पिंपळवाडी, रुई ब्रँच ऑफीस मार्फत राख्यांच्या टपालांचा बटावडा करण्यात आला. डाक सहायक प्रमोद शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली कामाची पहाणी करण्यात आली. या उपक्रमाला पोस्टमनकडुनही चांगला प्रतिसाद मिळाला.

आज रक्षाबंधन असल्याने टपाल खात्याकडुन भावा-बहिणीच्या प्रेमाला जपत पोस्टमनकडुन अनोखा उपक्रम राबविल्यामुळे रक्षाबंधंनाच्या सणाला दुरच्या बहिणीने पाठवलेली राखी मिळाल्याने आनंद होत आहे.

-विकास शिवगजे, नागरिक  

Web Title: #Rakshabandhan : postman did his duty on holiday also