Sangli Election : निवडणूक काळात ‘रामप्रहरी’ पोलिसांचा कडक पहारा; पुतळ्यांची विशेष जबाबदारी
Police Alert Mode During Election Period : निवडणूक काळात समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी ‘रामप्रहरी’ पोलिसांची विशेष गस्त, सांगली, मिरज व कुपवाडमध्ये पहाटेपासून गुड मॉर्निंग पथक रस्त्यावर
सांगली : निवडणुकीच्या काळात ‘रात्र वैऱ्याची आहे’ असं सर्रास ऐकायला मिळतं. जिल्ह्याची पार्श्वभूमी पाहता ते खरंही आहे. मिरजेत काही दिवसांपूर्वीच महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाली.