पदवी परीक्षा सप्टेंबरमध्ये

आरसीयुचे तात्कालिक वेळापत्रक ; कोरोनामुळे महाविद्यालयीन घडी अध्यापही विस्कटलेलीच
Rani Channamma University Degree Examination in September
Rani Channamma University Degree Examination in September

बेळगाव - राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या (आरसीयु) अंतर्गत येणाऱ्या पदवी द्वितीय, चतुर्थ व सहाव्या सेमीस्टरच्या परीक्षांना २ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. याचे तात्कालीक वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे. परीक्षा अवघा दिड महिना शिल्लक राहिला आहे. यामुळे होम असायमेंट व कॉलेज अंतर्गत होणाऱ्या परीक्षा घेतल्या जात आहेत. विद्यार्थीही अभ्यासात गुंतले आहेत.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. अध्यापही ही गाडी रुळावर आलेली नाही. दरवर्षी एप्रिल ते मे दरम्यान अंतीम परीक्षा होऊन जुलै दरम्यान निकाल लागतो व पुढील सेमीस्टरला सुरुवात देखील होते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे ही घडी विस्कटली आहे. यंदाच्या परीक्षाच सप्टेंबरमध्ये होणार असून यंदाही वेळापत्रकाचे तीन तेरा वाजले आहेत. हे वेळापत्रक रुळावर आणण्यासाठी विद्यापीठालीही मोठी कसरत करावी लागणार आहे.

कोरोनामुळे शालेय अभ्यासक्रमाची घडी देखील विस्कटली होती. मात्र, शालेय शिक्षण पूर्वपदावर आले आहे. पुढील अभ्यासक्रमाला सुरुवात देखील झाली आहे. मात्र, पदवीच्या मागील परीक्षाच अध्याप झाल्या नाहीत. त्यामुळे परीक्षा होऊन निकाल लागेपर्यंत पराचसा कालावधी जाणार आहे. शैक्षणिक वर्ष पुढे गेल्यामुळे विद्यार्थ्यांचेही नुकसान होत आहे. परीक्षा व निकाल उशीरा लागल्यामुळे अन्य शाखात प्रवेश घेताना त्यांना देखील अडचणी येणार आहेत. यामुळे विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष पूर्वपदावर आणावे अशी मागणी केली जात आहे.

१० ऑक्टोबरला निकाल

पदवी द्वितीय, चतुर्थ व सहाव्या सेमीस्टरचे वर्ग ३० ऑगस्टपर्यंत चालणार आहेत. म्हणजे अजून एक महिना हे वर्ग चालणार असून त्यानंतर २ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर दरम्यान परीक्षा होणार आहेत. १ ऑक्टोबरपर्यंत पेपर तपासणी व १० ऑक्टोबरला निकाल दिला जाणार आहे. त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com