पदवी परीक्षा 6 सप्टेंबरपासून; आरसीयुकडून वेळापत्रक जाहीर

विद्यार्थ्यांना १६ ऑगस्टपर्यंत परीक्षा अर्ज भरता येणार आहेत
rani channamma university
rani channamma universitysakal

बेळगाव - राणी चन्नमा विद्यापीठाअंतर्गत (आरसीयु) येणाऱ्या पदवी परीक्षांचे तात्कालिक वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे. बी. ए., बी.कॉम., बी. एस्सी., बी.एस.डब्य्लू., बीबीए, बीसीए, बीएसस्सी (सीएस) यांच्या लिखीत परीक्षा ६ सप्टेंबरपासून होणार आहेत. विद्यार्थ्यांना १६ ऑगस्टपर्यंत परीक्षा अर्ज भरता येणार आहेत. तसेच लगेचच १३ पासून मुल्यमापनाला सुरुवात होणार आहे. निकाल लवकर लावण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे.

कोरोनामुळे परीक्षेचे वेळापत्रक बिघडले आहे. दरवर्षी जुलै मध्ये सेमीस्टरला सुरुवात होते. मात्र, अध्यापही शेवटची सेमीस्टरच सुरु आहे. त्यामुळे लवकरच परीक्षा घेऊन त्याचे नियोजन केले जात आहे. पदवी विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी २९ जुलै ते ६ ऑगस्टची मुदत दिली होती. मात्र, ही मुदत वाढविण्यात आली असून १६ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहे. तसेच १६ ऑगस्टला लिखित परीक्षा वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

प्रायोगिक परीक्षा २३ ऑगस्टपासून होणार आहे.स्टुडंट पोर्टलच्या माध्यमातून २९ ऑगस्टनंतर प्रवेश पत्र डाऊनलोड करता येणार आहे. बेळगाव, चिकोडी, विजापूर, बागलकोट, जमखंडी आदी केंद्रावर परीक्षा सामुग्री व उत्तर पत्रिका वितरण ४ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर पर्यंत केले जाणार आहे. लिखीत परीक्षा ६ सप्टेंबरपासून तर १३ पासून मुल्यमापन होणार आहे. यांच्यासाठी अर्ज शुल्क ८० रुपये आहे.

मार्क कार्ड १२० रुपये, प्रोजक्ट, व्हायवा शुल्क ४८० रुपये आहे. बी. ए., बी.कॉम., बी. एस्सी., बी.एस.डब्य्लूसाठी परीक्षा शुल्क ८०० रुपये, रीपीटर्ससाठी प्रत्येक विषयाला २४० रुपये, जास्तीत जास्त ८०० रुपये आहे. बीबीए, बीसीए, बीएसस्सी (सीएस)साठी परीक्षा शुल्क ९६० रुपये, रीपीर्टसाठी प्रत्येक विषयाला २४० व जास्तीत जास्त ९६० रुपये शुल्क आहे. रीव्हॅल्यूवेशन शुल्क ४८० रुपये(प्रत्येक पेपर), फोटो कॉफी शुल्क ६०० रुपये (प्रत्येक पेपर), पासिंग सर्टीफीकेट फी १४० रुपये (अंतीम सेमीस्टर फक्त), कॉन्व्हकेशन शुल्क १२०० रुपये, मार्कस कार्ड नाव बदल ४२० रुपये, डुप्लिकेट मार्कस कार्ड प्रत्येकी २४० रुपये असे शुल्क आकारले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com