सांगली : कडेगावचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बिपिन हसबनीस यांना बलात्कार प्रकरणात वाचवण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दबाव टाकल्याचा आरोप आज पीडितेने केला. आज तिने भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांच्यासमवेत पत्रकार परिषदेत बाजू मांडली.