सांगलीत आढळला दुर्मिळ पोवळा 

 The rare snake found in Sangli
The rare snake found in Sangli
Updated on

सांगली ः भारतात अतिशय दुर्मिळ असलेला "पोवळा' साप आढळून आला. शिंदेमळा परिसरात तो आढळून आला. नागरिकांनी कळवताच प्राणी मित्र मुस्तफा मुजावर, रफिक मुजावर, मंदार शिंपी यांनी तातडीने धाव घेत त्याला ताब्यात घेतले आणि वन विभागाच्या मदतीने त्याला निसर्गात मुक्त केले. 


आपल्याकडे आढळणारा पोवळा हा साप अतिशय दुर्मिळ आहे. महाराष्ट्र, गुजरात, पश्‍चिम बंगाल, तमिळानाडू आणि कर्नाकातील अनेक ठिकाणी त्याचा आधिवास आहे. या सापाला हिंदीत कालाधारी मूंगा म्हणतात. इंग्रजीत त्याचे नाव कोरल स्नेक असे आहे. तर शास्त्रीय भाषेत त्याला कॅलीओपीस मेलानुरुस (Calliopfis melanurus) म्हटले जाते. दुर्मिळ जातीचा हा साप आहे. जाडीने कमी, रंग फिक्कट तपकिरी आणि डोके व मानेचा रंग काळा तर शेपटीवर दोन काळ्या कडी असतात.

जमिनीखाली, गवत किंवा दगडांच्या खाली तो वास्तव्यात असतो. लांबी एक फुट दोन इंचापर्यंत त्याची अधिकतम लांबी आढळली आहे. हा साप अतिशय विषारी असून तो मानवी वस्तीत आढळत नाही. हा सापच दुर्मिळ असल्यामुळे त्याने दंश केल्याच्या घटना अभावानेच आढळतात. या सापाला डिवचले गेले असता शेपटी वर करून खवल्यांचा लाल रंग प्रदर्शित करतो. प्रजनन वाळक्‍या पालापाचोळ्यात किंवा दगडाच्या सपाटीत असते. मादी दोन ते सात इतकी अंडी घालते. सर्पोद्यानात वाळा साप घालल्याची नोंद आहे. संरक्षण कायद्यांतर्गंत त्याचा शेड्युल (2) मध्ये समावेश आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Almatti Dam water level latest news
Dhairyashil Kadam SIR campaign statement
Atpadi student NEET success story
Karnataka Hippargi Barrage gates
Marathi News Esakal
www.esakal.com