कोकरूड-शेडगेवाडी मार्ग दुहेरीसाठी रास्तारोको 

बाजीराव घोडे
Wednesday, 23 December 2020

खुजगांव (ता. शिराळा) येथील कोकरूड-शेडगेवाडी मार्गावरील वारणा जलसेतू जवळील वळण धोकादायक बनले असून समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने या ठिकाणी वेळोवेळी अपघात होत आहेत.

कोकरूड : खुजगांव (ता. शिराळा) येथील कोकरूड-शेडगेवाडी मार्गावरील वारणा जलसेतू जवळील वळण धोकादायक बनले असून समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने या ठिकाणी वेळोवेळी अपघात होत आहेत.

यामुळे येथे दुहेरी मार्ग करावा यासाठी खुजगांव ग्रामस्थ व महाडिक युवा शक्ती प्रवाशी वाहतुक संघटना यांनी मंगळवारी सकाळी अकरा वाजता केलेला रास्तारोको अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहअभियंता रोकडे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर स्थगित करण्यात आला. 

कराड-रत्नागिरी मार्गाचे महामार्गात रूपांतर होत असून रस्ता रूंदीकरणाचे काम वेगाने चालू आहे. पंरतु, खुजगांव येथील वारणेच्या नंबर 1 व 2 नंबरच्या पिलर जवळ समोरून येणारे वाहन दिसत नसल्यामुळे याठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. रस्ता रूंदीकरणावेळी दुहेरी मार्ग काढला जाईल, असे आश्वाशन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले होते. पंरतु त्याचा विसर या आधिकाऱ्यांना पडला आहे. 

त्यामुळे ग्रामस्थ व महाडिक युवा शक्ती वाहतुक संघटना यांनी आज रास्तारोको केला. शिराळचे नायब तहसिलदार आर. बी. शिद यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी महाडिक युवा शक्तीचे अनिल घोडे, शामराव सावंत, बाळू सावंत, बाजीराव शेडगे, नथुराम सावंत, खिरवडे, सरपंच प्रमोद पाटील, दिनकर शेडगे, नाटवडेचे सरपंच बाजीराव मोहिते आदी उपस्थित होते.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rastaroko for Kokrud-Shedgewadi route double