
रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे विजयी उमेदवार उदय सामंत आणि महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार बाळ माने यांना केंद्रनिहाय मिळालेल्या मतांचा विचार केल्यास बहुसंख्य अल्पसंख्याक समाज आघाडीच्या बाजूने राहिला. त्याला जयगड केंद्र अपवाद आहे. रत्नागिरी शहरातील अल्पसंख्याकांची काही मते वळवण्यात सामंत यशस्वी ठरले आहेत; परंतु ग्रामीण भागात उबाठाचे वर्चस्व असलेल्या केंद्रांवर उदय सामंतांचा प्रभाव राहिला. तसेच उबाठाचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या मालगुंडमध्येही सामंतांनाच पसंती मिळाली.