
सांगली : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या थकीत कर्जासाठी ताब्यात असलेल्या दोन साखर कारखान्यांसह सहा संस्थांकडे थकीत असलेल्या २६४ कोटी रुपये वसुलीसाठी बॅंक प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. थकबाकी वसुलीसाठी रिझर्व्ह बॅंकेचा दबाब असल्याचेही समजते. थकीत कर्जासाठी या सहा मालमत्ता ताब्यात घेतल्यानंतर सात वर्षांत संपूर्ण थकबाकी वसूल होणे अपेक्षित आहे. अद्याप दोन वर्षे शिल्लक आहेत. या संस्थांची मुदतपूर्व विक्री अथवा लिलाव प्रक्रियेच्या कायदेशीर मार्गाचा विचार सुरू आहे.