लाखाहून अधिक भावांपर्यंत बहिणीची राखी पोहोच...डाक विभागाने सुटी न घेता राबवली वितरण यंत्रणा 

घनशाम नवाथे
Friday, 7 August 2020

सांगली-  "कोरोना' च्या पार्श्‍वभूमीवर "लॉकडाउन' असताना देखील शहरी व ग्रामीण भागातील डाक सेवकांनी दोन आठवडे सुटी न घेता पवित्र सणाचे महत्व लक्षात घेऊन लाखाहून अधिक राख्यांचे वितरण केले. राखी वितरणासाठी विशेष यंत्रणा राबवून वेळेत भावाकडे राखी पोहोच केल्याबद्दल डाक विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

सांगली-  "कोरोना' च्या पार्श्‍वभूमीवर "लॉकडाउन' असताना देखील शहरी व ग्रामीण भागातील डाक सेवकांनी दोन आठवडे सुटी न घेता पवित्र सणाचे महत्व लक्षात घेऊन लाखाहून अधिक राख्यांचे वितरण केले. राखी वितरणासाठी विशेष यंत्रणा राबवून वेळेत भावाकडे राखी पोहोच केल्याबद्दल डाक विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

भारतीय संस्कृतीमध्ये "राखी' हा सण महत्वाचा उत्सव आहे. बहिण-भावाचे अतूट नाते दृढ करणारा हा सण प्रेमभावना जपतो. दूरवर असलेल्या भावाला राखी पोहोच करण्यासाठी डाक विभागाने गेल्या अनेक वर्षात विश्‍वास निर्माण केला आहे. खासगी कुरीअरच्या वेगवान जमान्यातही डाक विभागावर विश्‍वास आहे. सध्या वाहतुकीची अनेक साधने उपलब्ध असली तरी डाक विभागाने देखील जलद सेवेत स्पर्धा निर्माण केली आहे. त्यामुळे इतक्‍या वर्षानंतरही दूरवरच्या भावाला राखी पाठवण्यासाठी पोस्टाचाच आधार वाटतो. 

यंदा राखी पौर्णिमेवर कोरोनाचे सावट आले होते. लॉकडाउन आणि जिल्हा बंदीमुळे भावा-बहिणीची भेट होणे शक्‍य नव्हते. त्यामुळे बहिणीची राखी भावापर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी डाक विभागाने विशेष वितरण व्यवस्था राबवण्याचा निर्णय घेतला. सांगली जिल्ह्यातील डाक विभागाने दोन आठवडे सुटी न घेत राखी वेळेत पोहोच करण्यासाठी यंत्रणा राबवली. सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प असताना देखील पोस्टमन दादांनी विशेष भूमिका बजावत रविवारी देखील कामावर उपस्थिती दर्शवली. त्यानुसार पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर सकाळपासून सर्वत्र राख्या वितरीत केल्या. 
राखी पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर राखी भावापर्यंत पोहोच करण्याचा संकल्प डाक विभागाने केला होता. तो पूर्ण झाला. तब्बल लाखाहून अधिक लाडक्‍या बहिणींनी पाठवलेल्या राख्या पोहोच करून बहिण-भावाचे पवित्र नाते अधिक दृढ केले. त्यामुळे डाक विभागावरील विश्‍वास आणखीन दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. असंख्य बहिण-भावांनी मनोमन डाक विभागाचे कौतुकही केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reaching sister's rakhi to more than one lakh brothers . The postal department implemented the distribution system without taking leave