esakal | होय; इथं मुलं शेकड्यात पुस्तकं वाचतात...
sakal

बोलून बातमी शोधा

 "Read the books and receive prizes" in response to the competition in Islamabad

आदिती (417), ओंकार (388), चैतन्य (342), ओम (245), निषाद (212), सत्यजित (145), प्रथमेश (122), रविराज (113),..... अशी मुलांची भली मोठी यादी आहे. हे कंसातले आकडे म्हणजे त्यांना कुठल्या परीक्षेत वगैरे मिळालेले गुण नव्हेत. तुम्हाला धक्का बसेल की, हे त्यांनी वाचून काढलेल्या पुस्तकांचे आकडे आहेत

होय; इथं मुलं शेकड्यात पुस्तकं वाचतात...

sakal_logo
By
धर्मवीर पाटील

इस्लामपूर : आदिती (417), ओंकार (388), चैतन्य (342), ओम (245), निषाद (212), सत्यजित (145), प्रथमेश (122), रविराज (113),..... अशी मुलांची भली मोठी यादी आहे. हे कंसातले आकडे म्हणजे त्यांना कुठल्या परीक्षेत वगैरे मिळालेले गुण नव्हेत. तुम्हाला धक्का बसेल की, हे त्यांनी वाचून काढलेल्या पुस्तकांचे आकडे आहेत आणि ते ही अवघ्या दोन महिन्यात. मुलं वाचनापासून दुरावली आहेत असं बोललं जात असताना असं काही समोर येणं दिलासा देणारं आणि आनंददायी असंच.

येथील तालुका सार्वजनिक वाचनालयाने या वाचनप्रिय मुलांचा वसंत व्याख्यानमालेत ज्येष्ठ विचारवंत विवेक घळसासी यांच्या हस्ते सत्कार केला. "पुस्तके वाचा आणि बक्षिसे मिळवा' अशी ही योजना. 135 वर्षे जुन्या या वाचनालयाने ग्रंथप्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून ही स्पर्धा घेतली.

अवघ्या दोन महिन्यांत या मुलांनी ही पुस्तके वाचली. फक्त यादीपुरती पुस्तके न्यायची नाहीत तर ती वाचून एका वहीत त्यांचा सारांशही लिहायचा अशी पूर्वअट होती. तब्बल 80 मुलांनी पुस्तकांचा फडशा पाडला. डॉ. बा. रा. जोशी ट्रस्टच्या वतीने डॉ. सदानंद जोशी दरवर्षी या योजनेतील यशस्वी मुलांना शैक्षणिक साहित्य देऊन गौरवीत असतात. 

आदिती दत्तात्रय गवळी (417), ओंकार मानसिंग पाटील (388), चैतन्य संजय पाटील (342), ओम अरुण गलुगडे (245), निषाद नामदेव पाटील (212), सत्यजित सुरेश दांडगे (145), प्रथमेश हणमंत माने (122), रविराज प्रमोद सावंत (113), सृष्टी रामचंद्र लोंढे (112), श्रेणीक संजय देसाई (102), भक्ती संदीप दमामे (101), वैष्णवी अमोल सावंत (100) अशी अग्रणी वाचकांची नावे. 

मुलांचा बौद्धिक आणि मानसिक विकासासाठी पुस्तके मोलाची

वाचनवेड वाढवण्यासाठीच्या या योजना मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास घडविणाऱ्या ठरतील. लहान वयात थोरांच्या चरित्र वाचन आयुष्यावर खोल परिणाम करणारे असते. मुलांचा बौद्धिक आणि मानसिक विकासासाठी पुस्तके मोलाची भूमिका पार पाडतात. मुलं टीव्ही-मोबाईलमध्ये अडकली आहे याची चिंता करण्याऐवजी असे पर्याय दिले पाहिजेत.

- विवेक घळसासी, ज्येष्ठ विचारवंत. 

loading image