पैलवानांची आर्थिक कोंडी कशी झाली वाचा

PHOTO-2020-04-25-17-37-20.jpg
PHOTO-2020-04-25-17-37-20.jpg

नवेखेड (सांगली) ः कोरोनाच्या प्रसारामुळे सर्वत्र लॉक डाऊनची परिस्थिती निर्माण झाल्याने गावोगावची कुस्ती मैदाने थांबली आहेत कुस्ती क्षेत्रात दहा कोटींहून अधिक रुपयांची होणारी उलाढाल थांबली आहे पैलवानांची आर्थिक कोंडी झाल्याने ते अडचणीत आले आहेत 

महापुरानंतर काही दिवसातच आलेला कोरोना आजार यामुळे जिल्हा लॉक डाऊन परस्थिती अनुभवत आहे. यामुळे जिल्ह्यातील जवळपास साठ अधिक कुस्ती मैदाने रद्द झाली आहेत. सध्या तालमीना ही कुलपे लागली आहेत दंड बैठका शड्डूचे गावोगाव घुमणारे आवाज थांबले आहेत

मागील ऑगस्ट महिन्यात कृष्णा व वारणा काठावर मोठा महापूर आला त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कुंडल पलूस देवराष्ट्रे बाबवडे बोरगाव हे कुस्तीची मुख्य मैदाने रद्द झाली यामुळे मल्ल व कुस्ती शौकिनांच्या उत्साहावर पाणी पडले पुढे फेब्रुवारी महिन्यापासून गावो गाव जत्रा यात्रांचा हंगाम सुरू व्हायचा तो मे अखेर चालतो जिल्ह्यात चिंचोली पाडळी विटा बेनापूर त्याचबरोबर साखर कारखाने आयोजीत केलेली कुस्ती मैदान होतात वर्षभर सराव केलेले मल्ल या गावोगावच्या कुस्ती मैदानात मोठ्या आशेने उतरतात अलीकडे बऱ्यापैकी बिदागी मिळत असल्याने मल्लही समाधानी असतो मिळालेल्या या बिदागी मधून पुढील वर्षाच्या आपल्या कुस्तीच्या खुरकाचा खर्च भागवतात मैदानी संपली की ते आपापल्या गावाकडे परततात गावाकडे एक महिना राहवून पुन्हा जून पासून आपल्या तालमीत दाखल होतात आपल्या कमतरता शोधत पुढची स्वप्ने बघत सराव करतात परंतु हे वर्षे त्यांना अडचणीचे ठरले आहे मैदाने रद्द झाल्याने त्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे

पदरमोड करून खर्च भागववा लागेल अनेक मल्लांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्याकडे मोठी अडचण आहे त्यांची आर्थिक ओढाताण होणार आहे या वर्षी जिल्ह्यात साठ हुन अधिक मैदान रद्द झाली सुमारे दहा कोटींहून अधिक रुपयांची आर्थिक उलाढाल थांबली कुस्ती चे धावते समालोचन करणारे निवेदक आर्थिक अडचणीत आहेत

महाराष्ट्राचा क्रमांक एक जोडीतील मल्ल असे माऊली जमदाडे ,विजय गुटाळ ,सिकंदर शेख, मारुती जाधव ,योगेश बोंबाळे ,बाला रफिक शेख ,नंदू आबदार ,संतोष दोरवड ,हसन पटेल सुरज निकम ,भारत मदने , विष्णू खोसे किरण भगत गोकुळ आवारे हर्षद सदगीर आदर्श गुंड शिवराज राक्षे संतोष सुतार समीर देसाई गणेश जगताप योगेश पवार समाधान पाटील विजय धुमाळ 


गावोगावी होणारी मैदाने रद्द झाल्याने पैलवानांची आर्थिक अडचण झाली आहे त्याचबरोबर व्यायाम ही थांबला आहे त्याचा परिणाम पुढील वर्षांच्या वर्षाच्या स्पर्धा वर होईल 
पैलवान माऊली जमदाडे 
 
मैदाने रद्द झाल्याने पैलवानांची आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे व्यक्ती व सहकारी संस्था यांनी पुढे येऊन खुराकासाठी वस्तु रुपात मदत करावी 
ज्योतीराम वाजे कुस्ती निवेदक 
 
मैदाने रद्द झालेले पैलवान व कुस्ती अडचणीत सापडले आह गरीब कुटुंबातील महिलांना खुराकासाठी आर्थिक मदत गरजेचे आहे 
पैलवान विकास पाटील ( ऑल इंडिया चॅम्पियन) 
कुस्ती मार्गदर्शक बोरगाव 

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com