रेशन दुकानदाराविरुद्ध का केली तक्रार वाचा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

विहाळ येथील रेशन दुकानदार अनिल भुजबळ यांच्याकडे विहाळ व पोंधवडी दोन ठिकाणचे रेशन दुकान आहे. पोंधवडी येथील रेशनचा काही गहु व तांदूळ विहाळ येथेच उतरवला जात असुन हा गहु 16 रूपये किलोने विकला जात आहे. 

करमाळा (सोलापूर) : येथील रेशन दुकानदार नियमित रेशन दुकान न घडता ग्राहकांची लूट करत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी सोलापूर व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
विहाळ येथील रेशन दुकानदार अनिल भुजबळ यांच्याकडे विहाळ व पोंधवडी दोन ठिकाणचे रेशन दुकान आहे. पोंधवडी येथील रेशनचा काही गहु व तांदूळ विहाळ येथेच उतरवला जात असुन हा गहु 16 रूपये किलोने विकला जात आहे. रेशन दुकान वेळेवर न उघडणे, माल घेतल्यानंतर त्याची पावती न देणे, रेशन दुकानात आल्यानंतर ग्राहकांना उलटसुलट उत्तरे देणे यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. 
याबाबत जिल्हा पुरवठा निरीक्षक मुक्ता जाधव यांनी विहाळ येथील रेशन दुकानाला भेट दिली आहे. लवकरच विहाळ रेशन दुकानाची तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

काळ्या बाजाराने विक्री
विहाळचे रेशन दुकानदार ग्राहकांना उलटसुलट बोलुन कमी माल देत आहेत. गावातील अंत्योदय योजनेतील वृध्दाना कमी धान्य दिले जात आहे. काळ्याबाजाराने गहु व तांदूळ विक्री केला जात आहे. विहाळ रेशन दुकानाची तापासणी करून कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. 
- मोहन मारकड, ग्रामपंचायत सदस्य, विहाळ, करमाळा

अन्यथा कारवाई
ग्राहकांना रेशन दुकानदारांने ग्राहकांना योग्य वागणुक दिली पाहीजे. विहाळ रेशन दुकानाची लवकरच तपासणी करून योग्य ती कारवाई केली जाईल.
- समीर माने, तहसीलदार, करमाळा. 

तक्रार प्राप्त झाली
विहाळचे रेशन दुकानदार अनिल भुजबळ यांच्याविषयी तक्रारी प्राप्त झाली आहे. या तक्रारींची चौकशी करून त्यात दुकानदार दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
-  व्ही. सी. पवार, पुरवठा अव्वल कारकून, करमाळा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read why the complaint was filed against the ration shopkeeper