सांगली जिल्ह्यातील विशेष मोहिमेतील शिधापत्रिकांना "ब्रेक' का ते वाचा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

सांगली,  ःपालकमंत्री जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार "घरपोच शिधापत्रिका' मोहीम जिल्हा प्रशासनाने 10 ते 29 फेब्रुवारी दरम्यान राबवली. जिल्ह्यातील कुटुबांनीही पालकमंत्री तसेच पुरवठा विभागावर विश्‍वास दाखवत प्रतिसाद दिला. या काळात संपूर्ण जिल्ह्यातून 35 हजार 429 कुटुंबधारकांनी मोहिमेत अर्ज दाखल केले आहेत. यातील पन्नास टक्के कुटुंबापर्यंत नव्या शिधापत्रिका पोहोचली झालेल्या आहेत. पुरवठा विभागाने कुटुंबांना शिधापत्रिका देण्यासाठी कोल्हापूर शासकीय प्रिंटिंग प्रेसमधून 40 हजार शिधापत्रिका छापल्या आहेत. मात्र कोरोनामुळे मोहीम थंडावली आहे. 

 जिल्ह्यात शिधापत्रिकांच्या विशेष मोहिमेला "कोरोनाचा ब्रेक' लागला आहे. जिल्ह्यात नव्याने शिधापत्रिकांसाठी 36 हजार 500 अर्ज आले होते. त्यांना मार्च अखेरचे उद्दिष्ट होते. यातील पन्नास टक्के लोकांना अद्याप शिधापत्रिका वाटल्या आहेत. मात्र कोरोना संसर्गामुळे अन्य लोकांना प्रतीक्षा आहे. गेली दोन महिने पुरवठा विभाग विविध योजनांचे मोफत आणि नियमित धान्य देण्यात व्यस्त आहेत. कोरोना आटोक्‍यात आल्यानंतरच हा विषय मार्गी लागेल, अशी चिन्हे आहेत. 

प्रत्येक नागरिकाला दैनंदिन कामकाजांत आवश्‍यक कागदपत्रांत शिधापत्रिका महत्त्वाचा पुरावा आहे. शिधापत्रिकांतील नोंदी अद्ययावत असणे आवश्‍यक आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्यांच्या शिधापत्रिकेतील नोंदी अद्ययावत करणे, आवश्‍यकतेनुसार नाव कमी करणे व वाढवणे, जीर्ण, खराब तसेच गहाळ शिधापत्रिका बदलून (दुबार), विभक्त शिधापत्रिका देण्यासाठी मोहीम राबवली आहे. 

  • दृष्टिक्षेपात आकडेवारी 
  •  शिधापत्रिकांची मागणी- 36 हजार 429 
  •  केशरी दुबार-23829, नवीन- 6578 
  •  पिवळी दुबार- 5417, 
  •  शुभ्र-दुबार- 266, नवीन-103 
     
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read why the ration cards in the special campaign in Sangli district "break"