
-बलराज पवार
सांगली : महापालिका क्षेत्रात रेडी रेकनरच्या दरात सरासरी ५.७० टक्के वाढ झाली असली तरी प्रत्यक्षात बांधकाम दरात सुमारे ५ टक्के तर सदनिकांच्या दरात शहरातील विभागनिहाय आठ ते दहा टक्के इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे सदनिकांचे दर सुमारे २०० ते ३०० रुपयांनी भडकण्याची शक्यता आहे. सर्व सामान्यांचे घराचे स्वप्न धूसर होण्याची शक्यता असून त्याचा फटका बांधकाम क्षेत्राला बसणार आहे.