फुलांचे क्षेत्र कमी; गणरायाच्या स्वागताला फुलांचा तुटवडा

बाळासाहेब गणे
Friday, 21 August 2020

एक दिवसावर येऊन ठेपलेला गणरायाच्या स्वागताला फुलांचा तुटवडा जाणवत आहे. गणरायाचे आगमन होत असताना गणरायाची फुलांची आरास, पूजाविधी यासाठी लागणाऱ्या फुलांचा सध्या बाजारपेठेत तुटवडा जाणवण्याची शक्‍यता आहे. 

तुंग : एक दिवसावर येऊन ठेपलेला गणरायाच्या स्वागताला फुलांचा तुटवडा जाणवत आहे. गणरायाचे आगमन होत असताना गणरायाची फुलांची आरास, पूजाविधी यासाठी लागणाऱ्या फुलांचा सध्या बाजारपेठेत तुटवडा जाणवण्याची शक्‍यता आहे. 

कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्याने शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला तसेच फुलांना दर नसल्यामुळे उभी पिके काढून टाकली. त्यामुळे झेंडूसह इतर फुलांचे क्षेत्र कमी झाले. जे काही प्लॉट शिल्लक होते ते पावसाने गेले तर त्यातुन वाचलेल्या फुलांना तर दरच नाही.

त्यामुळे गणरायाचे आगमन होत असताना आरास करण्यासाठी फुलांचा तुटवडा जाणवणार असल्याचे चित्र आहे. प्रत्येक वर्षी गणपतीच्या अगोदर झेंडू शेवंती लागवड होत असते. परंतु यावर्षी या फुलांची लागवड कमी झाली. सध्या मंडळाची कमी झालेली संख्या व साधेपणाने करण्याची गणेशोत्सवाची तयारी यामुळे आहेत त्या झेंडूवरही दराचा परिणाम जाणवत आहे.

सध्या 10 किलोस 100 पासून 200 रूपयांपर्यंत झेंडू व शेवतींचा दर असल्याचे दिसून येत आहे. यामुळे घातलेला खर्चही निघत नसल्याचे अनिल जाधव या झेंडूउत्पादक शेतकऱ्याने सांगितले. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reduced flowering area; Lack of flowers to welcome the Republic