ब्रेकिंग : कोरोना बाधितांवर उपचारास नकार...मिरजेत खासगी रुग्णालयाच्या आठ कर्मचाऱ्यांविरुद्ध "मेस्मा' अंतर्गत गुन्हा...जिल्ह्यात पहिलाच गुन्हा 

प्रमोद जेरे 
Thursday, 30 July 2020

मिरज (सांगली)- कोरोनासाठी उपचार घेण्यास रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यास नकार दर्शवणाऱ्या खासगी रुग्णालयातील आठ कर्मचाऱ्यांविरुद्धध आज (बुधवारी) येथील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात "मेस्मा" कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. "मेस्मा' कायद्याअंतर्गत जिल्ह्यात दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे. दरम्यान हे आठही कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात कामावर येत नसल्याचे संबंधित रुग्णालय व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सांगली रस्त्यावरील एका प्रसिद्ध रूग्णालयात कोरोना उपचारांसाठी दाखल होणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यास या आठ कर्मचाऱ्यांनी नकार दर्शवला. त्यांना याबाबत रुग्णालय व्यवस्थापनाकडून वारंवार समजावून सांगण्यात आले. तरीही या आठ जणांनी आपल्या भूमिकेत बदल केला नाही. याबाबतचा अहवाल रुग्णालय व्यवस्थापनाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना पाठवला होता. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी याबाबत कारवाई करण्याचे आदेश महापालिकेस दिले. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आरोग्य अधिकारी डॉ सुनील आंबोळे यांना या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यास सांगितले. आरोग्य अधिकारी डॉ.आंबोळे यांनी याची सविस्तर चौकशी करून संबंधित आठ कर्मचाऱ्यांविरुद्ध "महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005', "भारतीय साथरोग नियमन अधिनियम 1987', आणि "महाराष्ट्र इसेन्शियल सर्विसेस अँड मेंटेनन्स ऍक्‍ट 2007' या तीन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

मेस्मा म्हणजे काय- 
महाराष्ट्र अत्यावश्‍यक सेवा परीरक्षण कायदा हा राज्यात 2011 साली संमत करण्यात आला. 2012 मध्ये त्यात थोडा बदल केला. हा कायदा लागू असलेल्या विभागातील कर्मचाऱ्यांना संप करता येत नाही. कर्मचाऱ्यांनी असा प्रयत्न केला तर त्यांना अटक करता येऊ शकते. प्रामुख्याने हॉस्पिटल्स, दवाखाने यांच्यासह सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता राखण्यासंदर्भातील सेवा या अत्यावश्‍यक सेवेत गणल्या जातात. 

संपादन : घनशाम नवाथे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Refusal to treat Corona victims: Mesma case against eight employees of private hospital in Miraj . first case in the district