उपचारासाठी अनामत मागणाऱ्या हॉस्पिटलवर गुन्हा नोंदवू...जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांचा इशारा

विष्णू मोहिते
Thursday, 27 August 2020

सांगली-  कोरोना रुग्णांवर उपचारासाठी चार दिवसात नव्याने विस्तारीत बेड तयार केली जातील. दवाखान्यांच्या तपासणीसाठी तीन भरारी पथकांची नेमणुक आणि महापालिका हद्दीसाठी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना हॉस्पिटल देण्यासाठी एकाच सनियंत्रण केंद्राबाबत तातडीने निर्णय घेवू, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, रुग्णांवर उपचारासाठी दाखल करुन घेताना सबंधितांकडून अनामत रक्कम मागणाऱ्या हॉस्पिटलवर विरोधात तक्रार करा एफआयआर दाखल करु, असा इशाराही त्यांनी दिला. 

सांगली-  कोरोना रुग्णांवर उपचारासाठी चार दिवसात नव्याने विस्तारीत बेड तयार केली जातील. दवाखान्यांच्या तपासणीसाठी तीन भरारी पथकांची नेमणुक आणि महापालिका हद्दीसाठी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना हॉस्पिटल देण्यासाठी एकाच सनियंत्रण केंद्राबाबत तातडीने निर्णय घेवू, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, रुग्णांवर उपचारासाठी दाखल करुन घेताना सबंधितांकडून अनामत रक्कम मागणाऱ्या हॉस्पिटलवर विरोधात तक्रार करा एफआयआर दाखल करु, असा इशाराही त्यांनी दिला. 

डॉ. चौधरी म्हणाले,"" जिल्ह्यात नियमीत आरटीपीसीआर टेस्ट तपासण्याची क्षमता प्रतिदिन 800 आहे. गेल्या आठवडाभरात जास्त रुग्णांचे स्वॅब घेतल्यामुळे रिपोर्टसाठी तीन-चार दिवस लागले. तपासणीसाठी जादा कर्मचारी देवून प्रतिदिन 1000 हजार जणांची तपासणी होईल, असे पाहिले जाईल. या शिवाय ऍन्टिजेन टेस्टही चार दिवसात संपलेल्या आहेत. नव्याने 40 हजार ऍन्टिजेन टेस्टची मागणी केली आहे. दररोज 1500 जणांच्या टेस्ट अपेक्षीत आहेत. एकूण 2500 टेस्ट होतील. ऍन्टिजेन टेस्ट दोन दिवसात येतील. जे रुग्ण संशयित वाटतात त्यांचीच यापुढे तपासणी केली जाईल. जिल्ह्यातील खासगी लॅब चालकांना स्वॅब तपासण्यासाठीचे आवाहन केले आहे. काहींनी तातडीने त्यांची अंमलबजावणी करु असे सांगितले आहे. भारती हॉस्पिटल व प्रकाश इंन्टिट्युट येथे तपासण्या केंद्र सुरु होत आहे. 

डॉ. चौधरी म्हणाले,"" सध्या 50 वर्षावरील लोकांचे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. मात्र 20 ते 50 वर्षाच्या दरम्यान पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाची कमी लक्षणे असलेल्यांवर घरीच उपचार केले जातील. त्यापेक्षा जादा लक्षणे आढळलेल्यांवर रुग्णालयात उपचार केले जातील. मात्र लोक तसेच रुग्णांचे नातेवाईकांकडून तातडीने गरज नसतानाही ऑक्‍सिजन सिलिंडरच सरसकट मागणीने गोंधळ निर्माण होतो आहे. उपचारासाठी रुग्णांना होणारी भटकंती थांबवण्यासाठी तातडीने एक सनियंक्षण कक्षाबाबत विचार करु. या केंद्रातून दिलेल्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण तातडीने उपचारासाठी घेतलाच जाईल. गंभीर परस्थितीत बेडचा काहीसा विचार बाजुला ठेवूनही एक-दोघांना उपचारासाठी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले," एका हॉस्पिटलमध्ये डिपॉझिटसाठी रुग्णांचा मृत्यू झाल्याची तक्रार आहे. याबाबत महापालिका आयुक्त नितिन कापडणीस यांना चौकशी करुन तातडीने अहवाल देण्यास सांगितले आहे. महापालिकेने सुरु केलेल्या रुग्णालयात केवळ महापालिका हद्दीतीलच नव्हे तर गंभीर रुग्णांवरही उपचार करावेत, असे सांगितले आहे.' 

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले... 
0 कोरोना हॉस्पिटलसाठी साखर कारखान्यांनी पुढे यावे 
0 वसंतदादा कारखान्याकडून हॉस्पिटलसाठी चर्चा, प्रस्ताव नाही 
0 रुग्णांकडून जादा रक्कम घेणाऱ्या हॉस्पिटलना नोटीसा 
0 शहरात 1154 ऑक्‍सिजन बेड 
0 लोकांनी न घाबरुन वेळेवर उपचार घ्यावेत 
0 कोरोना पॉझिटिव्हची माहिती आता सबंधितांना एसएमएसव्दारे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To register a crime at the hospital asking for a deposit for treatment. Collector Dr. Chaudhary's warning