द्राक्ष निर्यातीसाठी दीड हजार हेक्‍टर बागांची नोंदणी 

Registration of one and a half thousand hectare orchards for grape export
Registration of one and a half thousand hectare orchards for grape export

सांगली : जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीसाठी सन 2020-21 साठी दोन हजार 937 शेतकऱ्यांच्या 1527.36 हेक्‍टरची नोंदणी झालेली आहे. गेल्या वर्षी दोन हजार 135 शेतकऱ्यांच्या 1178 हेक्‍टरची नोंदणी झाली होती. गेल्या वर्षीपेक्षा 802 शेतकऱ्यांची संख्या आणि 350 हेक्‍टरनी क्षेत्रही वाढले आहे. 

निर्यातीसाठी 30 नोव्हेंबर अंतिम मुदत होती. या काळात सरकारी कार्यालयाना चार दिवस सुटी, कर्मचारी संप झाला. परिणामी काही शेतकऱ्यांच्या नोंदणी अद्याप झालेली नाही. याचा विचार करुन निर्यातक्षम द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणीसाठी 20 डिसेंबरपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे. यामुळे आणखी क्षेत्र वाढणार आहे. रासायनिक अंश विरहीत शेतीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढत असल्याचे समाधानकारक चित्र पहायला मिळते आहे. 

गेली दोन वर्षे नैसर्गिक आपत्तीतही द्राक्ष निर्यातीत वाढच होत आहे. गेल्या वर्षी कोरोना साथीच्या काळातही द्राक्ष पिकांना फटका बसला होता. मात्र त्याचवेळी ज्या शेतकऱ्यांकडून निर्यात झाली. त्यांना मात्र चांगले दर मिळाल्याचे समाधानकारक चित्रही समोर आहे. द्राक्षासह बेदाणाही मोठ्या प्रमाणावर निर्यात होतो. याशिवाय डाळिंब, इतर फळे, भाजीपाला निर्यातही होते. जिल्ह्यातून सन 2019-20 मध्ये युरोपियन देशात 8 हजार 484 टन, तर इतर देशांत 9 हजार 770 टन द्राक्षे निर्यात झाली आहेत. 

जिल्ह्यात कृषी विभागाकडे द्राक्षाचे अधिकृत क्षेत्र 32 हजार हेक्‍टर नोंद आहे. द्राक्ष बागा, बेदाणा आणि प्रक्रिया उद्योगासाठी पाच लाख लोकांना रोजगार मिळतो हे राज्य सरकारनेही मान्य केलेले आहे. 
जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र तासगाव आणि खानापूर तालुक्‍यातील आहे. मिरज तालुक्‍यात द्राक्षाचे क्षेत्र जास्त असूनही निर्यातक्षम द्राक्ष पिकवणाऱ्यांची संख्या मात्र कमी आहे. 

प्रयोगशाळेची मदत होणार
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष, भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात युरोपीयन देश व इतर देशात निर्यात होते. त्यातील कीडनाशके, ऊर्वरित अंश तपासणीसाठी जिल्ह्यात प्रयोगशाळा उभारण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी 17 कोटी खर्च अपेक्षित आहे. याबाबत कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी नुकतीच मुंबई येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकही घेतली. त्याबाबत तातडीने निर्णय अपेक्षीत आहे. शेतमाल निर्यातीत जिल्ह्यातून द्राक्ष, डाळिंबाची दर वर्षी वाढ होत आहे. सध्या ही सुविधा पुणे येथे असल्याने सांगलीतील शेतकऱ्यांचा वेळ, पैसा खर्च होतो.तपासणी अहवाल वेळेत मिळून निर्यात लवकर होणार आहे. दर्जेदार, गुणवत्तापुर्ण पिकांचे उत्पादन घेण्यास प्रयोगशाळेची मदत होणार आहे. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com