सांगली : गणेशनगर येथे आर्थिक देवघेवीतून सलीम मुजावर याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील गुंड महंमद ऊर्फ म्हमद्या जमाल नदाफ याला मोबाईल व सिम कार्ड उपलब्ध करून देणाऱ्या नातेवाईकास पोलिसांनी अटक केली. .Death crocodile : कृष्णा नदीत मगरीचा मृत्यू; प्रदूषणाचा विळखा.अरफाज ऊर्फ अरबाज उमद नदाफ (वय ३१, बेघर वसाहत, दानोळी, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. म्हमद्याला आसरा देणाऱ्यांसह मदत करणाऱ्या अन्य काही संशयितांची नावे समोर आली आहेत. त्यांनाही अटक केली जाणार आहे. तसेच धान्य तस्कर फिरोज जित्तीकर हा देखील पोलिसांच्या ‘रडार’वर असल्याची माहिती निरीक्षक संजय मोरे यांनी दिली..पोलिसांनी सांगितले की, म्हमद्या टोळीतील सदस्य इम्रान दानवडे, पप्पू फाकडे आणि अजय माने यांच्यात आर्थिक देवघेवीतून वाद झाला होता. यामध्ये सलीम मुजावर हा माने याला मदत करत होता. त्यामुळे इम्रान आणि पप्पू यांनी म्हमद्याच्या मदतीने सलीम याचा काटा काढण्याचा कट रचला. फारूक नदाफ याच्या मदतीने १४ नोव्हेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास मुजावर याला बाहेर बोलवून घेतले. .तो आल्यानंतर म्हमद्याने त्याच्यावर गोळी झाडली. गोळीबारात मुजावर गंभीर जखमी झाला. त्याने खुनी हल्ल्याप्रकरणी फिर्याद दिल्यानंतर म्हमद्या, इम्रान, पप्पू आणि फारूक या चौघांना गुन्हे अन्वेषण व शहर पोलिसांनी अटक केली. दरम्यान चौघेही आता न्यायालयीन कोठडीत आहेत. म्हमद्याला मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला. .Gang behind bars : खोटे लग्न लावणारी टोळी गजाआड; चारजणांना अटक.त्यावेळी सिम कार्ड व मोबाईल उपलब्ध करून देणारा त्याचाच नातेवाईक असल्याचे समोर आले. त्यानुसार अरफाज नदाफ याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असते तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तसेच धान्य तस्कर फिरोज जत्तीकर याचे नाव समोर आले. त्याचाही शोध सुरू असल्याचे निरीक्षक मोरे यांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.