राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कट्टर समर्थकांचे नातेवाईक भाजपमध्ये

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

प्रवेश केलेल्यांमध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शिवाजी पवार, राजारामबापू कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विश्‍वास ऊर्फ बबूनाना पाटील यांचे पुत्र धनराज पाटील,  राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विजय कोळेकर यांचे पुत्र अक्षय कोळेकर, राजारामबापू बॅंकेचे संचालक बाबुराव हुबाले यांचे बंधू व हुबालवाडीचे उपसरपंच मधुकर हुबाले, तंटामुक्‍तीचे अध्यक्ष संजय हुबाले यांच्यासह आणखी तीन जयंत पाटील समर्थकांनी  भाजपमध्ये प्रवेश केला.

इस्लामपूर - राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करण्याची राज्यभरातील शृंखला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघापर्यंत पोहोचली. जयंत पाटील यांच्या कट्टर समर्थकांच्या नातेवाईकांनी नगराध्यक्ष निशिकांत भोसले - पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यात राजारामबापू बॅंक, राजारामबापू कारखाना, राष्ट्रवादीचे नगरसेवक यांचे नातेवाईक व माजी नगरसेवकाचा समावेश आहे. 

प्रवेश केलेल्यांमध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शिवाजी पवार, राजारामबापू कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विश्‍वास ऊर्फ बबूनाना पाटील यांचे पुत्र धनराज पाटील,  राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विजय कोळेकर यांचे पुत्र अक्षय कोळेकर, राजारामबापू बॅंकेचे संचालक बाबुराव हुबाले यांचे बंधू व हुबालवाडीचे उपसरपंच मधुकर हुबाले, तंटामुक्‍तीचे अध्यक्ष संजय हुबाले यांच्यासह आणखी तीन जयंत पाटील समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील व भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या उपस्थितीत हे प्रवेश झाले. यांचे प्रवेश हे जयंत पाटील यांना धक्का देणारे असल्याचे मानले जाते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जंगी कार्यक्रमात या कार्यकर्त्यांचा २८ ऑगस्टला सत्कार होणार असल्याची माहिती निशिकांत पाटील यांनी दिली. आज प्रवेश केलेले सर्वजण जयंत पाटील यांचे समर्थक आहेत. शिवाजी पवार हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आहेत. धनराज पाटील हे राष्ट्रवादीचे इस्लामपूर शहराध्यक्ष शहाजी पाटील यांचे पुतणे, तर राजारामबापू कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्‍वास पाटील यांचे पुत्र आहेत. विश्‍वास पाटील यांनी बराच काळ राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्षपद सांभाळले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Relatives of supporters of NCP state president Jayant Patil enters in BJP