मायक्रो फायनान्सच्या कर्जदारांना दिलासा; हप्त्यांसाठी एवढी रिजर्व बॅंकेची मुदतवाढ 

mixro finance.png
mixro finance.png
Updated on

सांगली ः मायक्रो फायनान्स कंपन्याकडून व्यवसायासाठी व अन्य कारणासाठी सूक्ष्म व लघु कर्ज घेतले आहे, अशा व्यक्तींना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी असलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत थांबल्यामुळे कर्जाचे हप्ते भरण्यास अडचण होत आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीय रिजर्व बॅंकेने 27 मार्च व 23 मे 2020 च्या आदेशानुसार मायक्रो फायनान्स कंपन्यांनी वितरीत केलेल्या सूक्ष्म व लघु कर्ज धारकांना हप्ता व व्याज यामध्ये विलंबावधीची मुभा 31 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढवून दिली आहे. मायक्रो फायनान्स कंपनी व लघु बॅंकेकडून कर्ज घेतलेल्या ज्या सूक्ष्म व लघु कर्ज धारकांना कर्जाचे हप्ते भरणे शक्‍य होत नाही, त्यांनी कंपनीकडे अर्ज करून हप्ते भरण्याची मुदत वाढवून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. 


भारतीय रिजर्व बॅंकेच्या या निर्देशामुळे गरीब कुटूंबातील व्यक्ती व बचत गटातील महिलांना दिलासा मिळाला आहे. याबाबत मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या शिखर संस्थेने सर्व मायक्रो फायनान्स कंपन्यांना पुढीलप्रमाणे सूचना दिल्या आहेत. लघु व सूक्ष्म कर्ज धारकांना कर्ज फेडण्यासाठी विलंबावधी 31 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढवून घेता येणार आहे. त्यासाठी कर्जदाराने अर्ज कंपनीकडे करावयाचा आहे. विलंबावधी वाढवून घेतला तरी कर्जावरील व्याजदरात वाढ होणार नाही.

विलंबावधी वाढवून घेतला तर त्यांच्या कर्जाची मुदत सहा महिन्यांनी पुढे जाईल. त्यामुळे कर्जदारांना संस्थेचे थकबाकीदार समजले जाणार नाही. विलंबावधी वाढवून घेणाऱ्या कर्जदारांना व्याज व हप्ते यासंबंधी सर्व माहिती कंपनीने स्थानिक भाषेत समजावून सांगावी, अशा सूचना दिल्या आहेत. 
.........  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why is kharif sowing delayed in Sangli?
Sangli Satara MLC election result 2026
Investigation Update: Mhamdya Nadaf’s Role in the Murder Conspiracy
Infrastructure Milestone: Trial Run on the 3.47km Karad Flyover
Marathi News Esakal
www.esakal.com