पुरलेला मृतदेह बाहेर काढून खुनाचा गुन्हा दाखल

सुदर्शन हांडे
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

बार्शी : कुर्डुवाडी रस्त्यावरील एका शेतात गुरुवारी (ता.17) सापडलेला मृतदेह बार्शी शहरातून अपहरण झालेल्या अल्पवयीन गणेश सुनील पवार याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला असून बेवारस म्हणून पोलिसांनी पुरलेला मृतदेह सोमवारी (ता.20) उकरून काढून पुन्हा उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकाराने चित्रपटा प्रमाणे थरार पाहायला मिळाला.

बार्शी : कुर्डुवाडी रस्त्यावरील एका शेतात गुरुवारी (ता.17) सापडलेला मृतदेह बार्शी शहरातून अपहरण झालेल्या अल्पवयीन गणेश सुनील पवार याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला असून बेवारस म्हणून पोलिसांनी पुरलेला मृतदेह सोमवारी (ता.20) उकरून काढून पुन्हा उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकाराने चित्रपटा प्रमाणे थरार पाहायला मिळाला.

याबाबत अधिक माहिती अशी की शुक्रवारी (ता.17) दुपारच्या वेळेस कुर्डुवाडी रस्त्यावरील एका शेतात पावसाच्या साचलेल्या पाण्यात अर्धवट कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला होता. या बाबत पोलिसात नोंद झाली होती. मृतदेह सापडूनही त्याची ओळख पटवण्यासाठी कोणीच पुढे आले नसल्याने व मृतदेहाची अवस्था वाईट झालेली असल्याने पोस्टमॉर्टेम करून बेवारस म्हणून मृतदेह पुरून टाकला होता. 

तर दुसरीकडे बार्शीतील गणेश सुनील पवार हा 14 ऑगस्ट पासून गायब होता. याबाबत 15 ऑगस्ट ला तो अल्पवयीन असल्याने अपहरणाची फिर्याद देण्यात आली होती. वर्तमानपत्रात बेवारस मृतदेह सापडल्याचा बातम्या पाहून गणेश पवार याच्या नातेवाईकांनी रविवारी (ता.19) संध्याकाळी पोलिसात धाव घेतली होती. यावेळी मृतदेहाच्या अंगावरील कपडे व गळ्यातील माळ यावरून हा गणेश पावर असल्याचे सांगण्यात आले.

बेवारस म्हणून मृतदेह पुरल्यानंतर नातेवाईकांनी पुढे येत कपड्यावरून ओळख पटवल्याने सोमवारी (ता.20) पुन्हा उकरून गणेश पवार यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या प्रकरणात गणेश पवार याचे नातेवाकांनी आक्रमक होत पोलिसांवर निष्काळजी पनाचा आरोप केला होता. म्हणून सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार ऋषीकेत शेळके, करमाळा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी, पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, वैद्यकीय अधिकारी रवींद्र माळी, नगरपालिका अधिकारी महादेव बोकेफोडे यांच्या व गणेश पवार याच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत इनकॅमेरा पडत्या पावसात मृतदेह बाहेर काढण्यात आला. 

याठिकाणी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा मृतदेहाची उत्तरीयतपासणी केली. तसेच सोलापूर येथून आलेल्या फॉरेन्सिक लॅबच्या तज्ञांनी आवश्यक घटक गोळा करून तपासणीसाठी नेले आहेत. गणेश पवार यांचा मृतदेह बाहेर काढून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मंगळवार पेठ येथील मोक्षधाम येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

14 ऑगस्ट पासूनच गणेश बेपत्ता होता. त्याच रात्री त्याचा खून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. 15 व 16 ऑगस्ट रोजी दिवसभर पाऊस असल्याने शेतातील मृतदेह कोणीच पहिला नाही तसेच पावसामुळे 17 ऑगस्ट पर्यंत मृतदेह अर्धवट कुजकेला होता. नंतर दोन दिवस मृतदेह पुरून नंतर वर काढण्यात आला. मृतदेह वर काढल्यानंतर परिसरात दुर्गंधी पसरली होती. चित्रपटातील दृश्य प्रमाणे बार्शीत घडणाऱ्या या घटनेमुळे मृतदेह काढताना बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. गणेश पवार यांचा खून कशामुळे झाला असेल याची काय कारण असतील या बाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. या बाबत पोलिसांनी अधिक माहिती मिळवली असून लवकरच सर्व घटनेचा छडा लावू असे पोलिसांनी सांगितले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील हे करत आहेत.

पोलिसांची मोठी चूक...

बार्शीत बेवारस मृतदेह सापडल्या नंतर त्याची ओळख पटवण्यास कोणीही पुढे येत नाही अश्यावेळी दोन दिवसांपूर्वी अपहरणाची फिर्याद दाखल केलेल्या नातेवाईकांना बोलवणे आवश्यक होते, पण तसे न करता बेवारस मृतदेह म्हणून तो पुरण्यात आला होता. 

Web Title: Removing the body of the dead and filing a murder charge