विटा शहरात पाण्यातील मोटरची पोहत जाऊन दुरुस्ती

गजानन बाबर
Friday, 1 January 2021

विटे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी विटा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. आळसंद (ता. खानापूर) येथील तलावात सुमारे 400 मीटर अंतरावर पाण्यात असणाऱ्या मोटरची पोहत जाऊन दुरुस्ती करून आपले कर्तव्य जिद्दीने, तळमळीने बजावले. 

विटा : विटे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी विटा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. आळसंद (ता. खानापूर) येथील तलावात सुमारे 400 मीटर अंतरावर पाण्यात असणाऱ्या मोटरची पोहत जाऊन दुरुस्ती करून आपले कर्तव्य जिद्दीने, तळमळीने बजावले. 

विटे शहराला सुमारे तीस बत्तीस किलोमीटर अंतरावरून घोगाव येथून कृष्णा नदीच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. एवढ्या लांब अंतरावरुन पाणीपुरवठा होत असल्यामुळे वेळोवेळी विविध कारणांमुळे नादुरुस्ती होते. पाइपलाइनची गळती ही होते. मात्र युवा नेते वैभव पाटील व मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी विटा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतात. पावसाळ्यात तर विविध समस्यांना सामोरे जात पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. अशी माहिती पाणीपुरवठा विभागातील अनिल निवृत्ती पवार यांनी दिली.
 
आळसंद तलावातील विटा नगरपालिका पाणीपुरवठा योजनेतील मोटरच्या पंपामध्ये वेस्ट प्लास्टिक व कचरा अडकल्याने पाणीपुरवठा बंद होता.त्या ठिकाणी सुमारे 400 मीटर पाण्यामध्ये टायरमधील रबरी इनरद्वारे पोहत जाऊन सदर कचरा काढला व मोटर चालू केली.आणि विटे शहरातील पाणीपुरवठा सुरळीतपणे चालू राहण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मल्हारी खिलारे,बाबू भांडवलकर,प्रमोद कांबळे,सुरेश भंडारे,बापू कुंभार यांनी मेहनतीने,धोका पत्करून हे काम पूर्ण केले.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Repair of swimming water motor in Vita town