अन्यायकारक शेतकरी कायदा रद्द करा; राज्यमंत्री विश्‍वजीत कदम; कॉंग्रेसचे सांगलीत सत्याग्रह आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

सांगली ः केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणारे अन्यायकारक कायदे व कामगारविरोधी कायदे तातडीने रद्द करा, अशी मागणी राज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांनी आज केली. जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या दारात किसान अधिकार दिवस पाळून सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. त्यावेळी  श्री. कदम बोलत होते. 

सांगली ः केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणारे अन्यायकारक कायदे व कामगारविरोधी कायदे तातडीने रद्द करा, अशी मागणी राज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांनी आज केली. जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या दारात किसान अधिकार दिवस पाळून सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. त्यावेळी  श्री. कदम बोलत होते. 

अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्यावतीने केंद्र सरकारच्या विरोधात संपूर्ण देशभर हे आंदोलन करण्यात येत आहे. किसान अधिकार दिवस पाळून हे सत्याग्रह सांगलीत आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना श्री. कदम म्हणाले,""आपला देश हा कृषिप्रधान आहे. या देशातील शेतकरी अत्यंत महत्वाचा आहे, असे असताना केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताला बाधा येईल आणि त्याचे नुकसान होईल अशा धर्तीचे कायदे निर्माण केले आहेत. या कायद्यामुळे शेतकरी आणि कामगार देशोधडीला लागणार आहेत. त्यामुळे हे कायदे तातडीने रद्द केले पाहिजेत यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.'' 

शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, ""शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे करणाऱ्या केंद्र सरकारला आता शेतकरी निश्‍चितच आपला हिसका दाखवतील. या जिल्ह्यातून या कायद्याला विरोध करण्यासाठी मोठ्याप्रमाणात आंदोलन निर्माण केले. त्याशिवाय या कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी घेतल्या आहेत.'' 

यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत, वसंतदादा साखर कारखान्यांचे अध्यक्ष विशाल पाटील, युवा नेते जितेश कदम, महिला आघाडीच्या नेत्या शैलजाभाबी पाटील, जयश्री पाटील, मालन मोहिते, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, नगरसेवक मनोज सरगर, वहिदा नायकवडी, कय्युम पटवेगार, रवींद्र खराडे, नामदेवराव मोहिते, बिपीन कदम यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Repeal the Unjust Farmers Act; Minister of State Vishwajeet Kadam; Congress's Sangli Satyagraha movement