इंदोरीकरांसाठी अकोल्यातील ग्रामपंचायतींचे ठराव, रविवारी तालुका राहणार बंद

Resolution of Gram Panchayat in Akole taluka for Indorekar
Resolution of Gram Panchayat in Akole taluka for Indorekar

अकोले : निवृत्ती महाराज देशमुख यांच्या समर्थनार्थ अकोलेकर एकवटले आहेत. रविवार दि २३ फेब्रुवारी २०२० रोजी तालुका बंद व तालुक्यातील ग्रामपंचायतीचे महाराजांचे समर्थनार्थ ठराव देऊन रविवारी टाळ, मृदंगाच्या स्वरात मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे.

नाहक बदनामी

तालुक्यातील वारकर्यांसह महाराजांच्या सर्व पक्षीय चाहत्यांची काल दुपारी अकोलेत बैठक संपन्न झाली. यावेळी महाराजांच्या समर्थनार्थ तालुक्याने उभे राहण्याचा निर्णय घेतला. ह.भ.प.निवृत्ती महाराजांची नाहक बदनामी सुरु आहे. महाराजांनी कीर्तनात पुञप्राप्तीविषयी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे.

गावोगाव होणार ठराव

वक्तव्यावर झालेल्या वादानंतर महाराजांनी  दिलगिरी व्यक्त करूनही सूडभावनेने गुन्हा दाखल करण्याचे षडयंञ रचून महाराजांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचा अकोले तालुक्याच्या वतीने निषेध केला. महाराजांच्या समर्थनार्थ उभे राहताना गाव-गावांतील ग्रामपंचायतीचे ठराव करण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवार व शनिवार सुट्टी असल्याने आजच सर्व ग्रामपंचायत ठराव देण्याचे ठरले. त्याबाबतचा फॅारमॅटही बैठकीत देण्यात आला.

टाळ-मृदंगाच्या गजरात  निघणार मोर्चा

रविवार २३ फेब्रुवारी २०२० रोजी संपूर्ण  तालुका बंद ठेवून महाराजांचे गाव असलेल्या इंदोरी येथून मोटारसायकल रॅलीने अकोले शहरात येवून महात्मा फुले चाैकातून टाळ मृदुंगाच्या निनादात बाजारतळापर्यत मोर्चा काढण्यात येणार आहे.

शांततेत होणार आंदोलन

बाजारतळावर निषेध सभा होऊन तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात येणार आहे. अतिशय शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com