बेळगावमध्ये प्रवेशासाठी निर्बंध चाचणी अहवाल किंवा कोरोना लस आवश्‍यक

बेळगावमध्ये प्रवेशासाठी निर्बंध चाचणी अहवाल किंवा कोरोना लस आवश्‍यक
e sakal
Updated on
Summary

बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी काही निर्बंध जारी करण्यात आले आहेत.

बेळगाव : महाराष्ट्रातील कोरोना (Corona) परिस्थितीची गंभीरपणे दखल घेऊन बेळगाव जिल्ह्यात (belgaum district) प्रवेश करण्यासाठी काही निर्बंध जारी करण्यात आले आहेत. विमान, रेल्वे, बस, टॅक्सी किंवा स्वमालकीच्या वाहनातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांचा ७२ तासांपूर्वीची आरटीपीसीआर (RTPCR) अहवाल निगेटिव्ह असावा. किंवा कोविडची किमान १ लस घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्‍यक असल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ (Collector M. G. Hiremath) यांनी बजाविला आहे. (restrictions on entry into belgaum district test report for corona vaccine is required)

बेळगावमध्ये प्रवेशासाठी निर्बंध चाचणी अहवाल किंवा कोरोना लस आवश्‍यक
बेळगाव : विद्यार्थ्यांचे लसीकरण 15 जुलैपर्यंत करा, विद्यापीठाच्या सूचना

बेळगाव जिल्ह्यात सायंकाळी ७ ते पहाटे ५ यावेळेत नाईट कर्फ्यू असेल. विमान, रेल्वे प्राधिकरणने ७२ तासांपूर्वीची आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह असलेल्यांना किंवा कोविडची किमान १ लस घेतल्याचे प्रमाणपत्र असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवासाला अनुमती द्यावी. बसने प्रवास करणाऱ्यांची प्रमाणपत्रे तपासण्याची जबाबदारी बसवाहकांची असेल. तर इतर वाहनातून प्रवास करणारे प्रवासी, वाहनचालक, त्यांचे सहाय्यक यांच्या प्रमाणपत्रांची तपासणी तपास नाक्यांवर करण्यात येईल.

बेळगावमध्ये प्रवेशासाठी निर्बंध चाचणी अहवाल किंवा कोरोना लस आवश्‍यक
बेळगाव जिल्हा अनलॉक; कोगनोळी नाका मात्र लॉकच

कोरोनावर किमान पहिली मात्रा घेतलेले व त्यासंबंधीचा पुरावा सोबत असणारे, वैद्यकीय कर्मचारी, तातडीच्या कामासाठी नेमलेले कर्मचारी, वय दोन वर्षाखालील मुले यांना निर्बंध शिथिल असतील. अंत्यसंस्कार किंवा वैद्यकीय उपचारासाठी महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्यांचे स्वॅब घेण्यात येईल. अशा व्यक्तींकडे ओळखपत्र, मोबाईल क्रमांक, संपूर्ण पत्ता असणे बंधनकारक आहे, असे जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com