पोलिस आयुक्तालयाकडून दीड कोटीचा ऐवज परत

दोन वर्षात साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त
 Money
Moneyesakal

बेळगाव : जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी प्रॉपर्टी परेडचे आयोजन केल्यावर त्यांच्यापाठोपाठ पोलिस आयुक्तालयातर्फेही आज प्रॉपर्टी परेडचे आयोजन करण्यात आले. २०१९ पासून २०२१ पर्यंत सुमारे तीन कोटी ५४ लाख ५१ हजार ४२९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यापैकी एक कोटी ५१ लाख ४० हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल आज पोलिस आयुक्तालयाच्या आवरणात आयोजित कार्यक्रमावेळी फिर्यादी आणि संबंधितांच्या वारसदारांना परत करण्यात आला.

पोलिस मुख्यालयाच्या आवारात आज प्रॉपर्टी परेडचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी पोलिस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, पोलिस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, पी. व्ही. स्नेहा यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. २०१९ मध्ये एक कोटी चार लाख ४२ हजार ५२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २०२० मध्ये एक कोटी ९५ लाख ४२ हजार ८२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला; तर सीईएन पोलिसांनी २०२० मध्ये ५४ लाख ६६ हजार ७१५ रुपये किमतीचा ३८ किलो ६६५ ग्राम वजनाचा गांजा जप्त केला आहे. एकूण तीन कोटी ५४ लाख ५१ हजार ४२९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोन्या-चांदीचे दागिने, मोटारसायकली, मोटारी यासह इतर मुद्देमालाचा यात समावेश आहे. या वेळी शहरातील सर्व एसीपी, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com