

सोलापूर : एमआयडीसी पोलिस ठाणे व जोडभावी पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी, सायकली व रोकड चोरीला गेली होती. या सहा गुन्ह्यातील पाच संशयित आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून शहर गुन्हे शाखेच्या पथकाने दोन लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.