esakal | पंढरपुरात रिव्हॉल्वरसह पाच जिवंत काडतुसे जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

crime

या प्रकरणी येथील शिवराज ननवरे (वय 22) या नामक संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अलीकडच्या काही दिवसांमध्ये पंढरपूर शहरात भुरट्या चोऱ्या, मारामाऱ्या असे सर्रास प्रकार घडू लागले आहेत.

पंढरपुरात रिव्हॉल्वरसह पाच जिवंत काडतुसे जप्त

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढू लागली आहे. ऐन गौरी गणपती सणाच्या काळातच शहरातील एका व्यक्तीकडून एक रिव्हॉल्वर व पाच जिवंत काडतूसे पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली.

या प्रकरणी येथील शिवराज ननवरे (वय 22) या नामक संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अलीकडच्या काही दिवसांमध्ये पंढरपूर शहरात भुरट्या चोऱ्या, मारामाऱ्या असे सर्रास प्रकार घडू लागले आहेत.

शहरातील वाढत्या अवैध धंद्यामुळे पुन्हा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. अशा परिस्थितीमध्ये शहरात बेकायदा शस्त्रे बाळगण्याचे प्रकारही या निमित्ताने समोर येवू लागले आहेत. सध्या शहरात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात सुरू आहे.

शहरात कायदा सुव्यवस्था अबाधीत राखण्याचे पोलिसांमोर आव्हान असतानाच एका व्यक्तीकडे गावठी रिव्हॉल्वर आणि पाच जिवंत काडतूसे सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी (ता. 2) मध्यरात्री संत गजानन महाराज मठा जवळच्या वाहन पार्किंग आवारात गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

loading image
go to top