मंगळवेढा : शहरालगतुन गेलेल्या महामार्गावर वाढलेल्या अपघातामध्ये निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्यामुळे सध्या शहर व तालुक्यात गतिरोधकाचा मुद्दा अधिक चर्चेला आला. मात्र प्रशासन आणखी किती बळीची वाट बघणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. .शहरातील अवजड वाहतूक बंद करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मागणीनंतर तब्बल 15 हून अधिक नागरिकांची जीव गेल्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडले त्यामध्ये पंढरपूर बायपास रोड पासून ते शहीद किसन माने चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात गतिरोधक उभारणी केल्यामुळे शहरांमध्ये येणारी अवजड वाहतूक कमी झाली.मात्र हे गतिरोधक इतर वाहनांना दिसत नसल्यामुळे अनेक वाहने या गतीरोधकावर आदळून वाहन खराब होऊ लागले त्यानंतर प्रशासनाने या गतीरोधकावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू केले ही बाब समाधानकारक आहे मात्र सध्या मंगळवेढा बायपास मार्गावरून जाताना मंगळवेढा -जुना ढवळस रस्ता,मंगळवेढा- धर्मगाव,मंगळवेढा-मरवडे, मंगळवेढा मढवी, तसेच मंगळवेढा-भाळवणी, मंगळवेढा- पाटकळ या ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते आहेत मात्र या ठिकाणी गतिरोधक नसल्यामुळे सध्या ही वाहने सुसाट जात आहेत.त्यामध्ये दोन दिवसापूर्वी सद्गुरूच्या बैठकीला जाणाऱ्या दोन महिला भरधाव वाहन दिसल्याने त्या रस्त्यालगत थांबल्या असताना तेच वाहन त्यांच्या अंगावर पलटून त्यांना जीव गमवावा लागला अगदी तशीच परिस्थिती मरवडे गावाजवळ भरधाव वाहन दुचाकीला धडकल्यामुळे कर्नाटकातील नागरिकाचा हकनाक बळी गेला.मरवडे येथे आतापर्यंत सहा जणांचे बळी गेले. गटविरोधक काढण्यासंदर्भात मरवडे नागरिक सोशल मीडियातून अनेक मत मतांतरे मांडू लागले. त्या ठिकाणी देखील गतिरोधकाची मागणी करून देखील महामार्गावरील अधिकाऱ्याने दुर्लक्ष केल्यानंतर इथल्या कार्यकर्त्यांनी खा. प्रणिती शिंदे यांच्याकडे धाव घेतली खा.शिंदे यांनी तात्काळ महामार्गाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्यानंतर महामार्गावरील अधिकाऱ्यांनी तात्काळ जागेची पाहणी केली मात्र प्रत्यक्षात या धोक्याच्या ठिकाणी गतिरोधक कधी उभा करणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. मंगळवेढा शहरालगत गेलो तर तात्काळ उभा करावीत अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा प्रहार चे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी दिला आहे..महामार्गावर गतिरोधक प्रस्तावित नसतात मात्र मंगळवेढ्यात बायपासवर 2 व मरवडेत 6 ठिकाणी नव्याने गतिरोधकाची मागणी समोर आली त्या संदर्भात स्थळ पाहणी केली असून जागेचे फोटो, नागरिकांकडून मागणीचे निवेदन, अपघाताची पोलीस प्रत जोडून गतिरोधकाबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे येत्या दोन दिवसात सादर करणार आहे.परीश गायकवाड,शाखा अभियंता,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.मरवडे ही लगतच्या 15 गावची बाजार पेठ, शाळा, हायस्कुल, राष्ट्रीयकृत बँक, प्राथमिक आरोग्य केंद्र,पशुवैद्यकीय दवाखाना, 10 पतसंस्था, पोस्ट ऑफिसमुळे नागरिक व विद्यार्थी यांची रहदारी असते. मागील 15 दिवसात 3 अपघात होऊन 3 मृत्यू झाले. या अपघातानंतर, खा. प्रणिती शिंदे यांना गतिरोधकाबाबत विनंती केली केला असता लोक भावना समजून अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले. स्थळपाहणी केली असून यावर कार्यवाही न केल्यास ग्रामस्थासोबत उग्र आंदोलन करणार आहोत.दत्ता मासाळ,मा.ग्रामपंचायत सदस्य मरवडे.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.