रितेशच्या रडण्याची अडचण होऊ नये, याकरिता त्याला झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या. तो अशा अवस्थेत असताना पाच ऑगस्टला त्याला चौघांनी आणखी पाणी पाजले.
रितेश देवताळे या मुलाचे अपहरण झाले. रितेश वाचावा म्हणून सारा जिल्हा प्रार्थना करत होता, मात्र दुर्दैवाने त्याचा घात झाला. आमदारकीचं स्वप्न पूर्ण करायला पैसे हवेत, यासाठी चिमुकल्या रितेशचे अपहरण करून गळा घोटला गेला. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी खटला लढवला. मी या खटल्याच्या तपासात सहभागी होतो. सन २००४ मध्ये तत्कालीन अतिरिक्त व सत्र न्यायाधीश एस. जी. हरताळकर यांनी आरोपींना जन्मठेप सुनावली.
-मुकुंद कुलकर्णी, पोलिस निरीक्षक