
सांगली : अपर पोलिस अधीक्षक रितू खोखर यांची धाराशिव येथे पदोन्नतीने अधीक्षकपदी बदली झाली. गृह विभागाने आज दुपारी राज्यातील २२ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले. खोखर या सन २०१८ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी अकोला जिल्ह्यातही काम पहिले होते. महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांनी सांगलीत प्रभावी मोहीम राबवली होती.