
सांगली : शहरातील मध्यवर्ती भागात एका सोसायटीतील रस्त्याचं भाग्य उजाडलं... नवा चकचकीत रस्ता झाला... कालपर्यंत नवा कोरा दिसणारा रस्ता हा जादू केल्यासारखाच हा ‘फट स्वाहा...’ झाला. हा रस्ता आज खड्ड्यात रुतला. हा कारभार केवळ सांगली महापालिकाच करू शकते, याचा प्रत्यय आज दिसून आला.