तरुणीला पळवून नेणाऱ्या रोडरोमिओची धुलाई 

Road Romeo Attempt To Kidnap Young Girl Peoples Hit Youth
Road Romeo Attempt To Kidnap Young Girl Peoples Hit Youth

इस्लामपूर (सांगली ) - वाळवा तालुक्‍यातील एका महाविद्यालयीन तरुणीला वाढदिवसानिमित्त बळजबरीने आपल्या गाडीत घालून पळवून नेणाऱ्या सांगली येथील रोडरोमिओला शिक्षकांनी पाठलाग करत वाटेगाव (ता. वाळवा) ग्रामस्थांच्या मदतीने पकडले. उपस्थित ग्रामस्थांनी मुलीला पळवून नेतोय म्हणून रोड रोमिओची यथेच्छ धुलाई केली. प्रकरण कासेगाव पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले, मात्र ऐनवेळी मुलीनेच तक्रार द्यायला नकार दिल्याने त्यावर पडदा पडला. 

शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित युवक वाढदिवस करण्यासाठी मुलगी शिकत असलेल्या महाविद्यालयाच्या परिसरात पोहोचला. तिला बोलावून घेत वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर चल असे म्हणत गोड बोलत त्या मुलीला त्याने गाडीत बसवले. मुलगी नाही म्हणत असतानाही गाडी भरधाव वेगाने त्या परिसरातून निघून गेली. याची माहिती महाविद्यालयातील शिक्षकांना तत्काळ समजल्यावर त्यांनी चारचाकी गाडीचा पाठलाग सुरू केला.

रोडरोमिओची यथेच्छ धुलाई

भांबावलेल्या युवकाने गाडी वाटेगावच्या दिशेला नेली. वाटेगाव बसस्थानक परिसरात वाहनांची गर्दी असल्यामुळे गाडी थांबली. यावेळी संबंधित मुलीने गाडीची काच खाली करत आरडाओरडा सुरू करत मला वाचवा अशी हाक दिली. परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांनी मुलगी असलेल्या गाडीकडे धाव घेतली. गाडी थांबल्यानंतर पाठीमागून शिक्षकही पोहोचले. मुलगीला जबरदस्तीने गाडीत घालून नेत असल्याचे लोकांच्या लक्षात आले. लोकांनी मुलीची सुटका करत रोडरोमिओच्या यथेच्छ धुलाईला सुरवात केली. शिक्षकांनी मध्यस्थी करत त्या रोडरोमिओला ताब्यात घेऊन कासेगाव पोलिस ठाणे गाठले. बराच वेळ यावर काथ्याकूट झाल्यानंतर मुलीनेच तक्रार द्यायला नकार दिला. पोलिसांनी रोडरोमिओला पोलिसी खाक्‍या दाखवत त्याच्याकडून माफीनामा लिहून घेत त्याला सोडून दिले. 

सोशल मीडियावर व्हिडिओ 

दरम्यान वाटेगाव परिसरात रोडरोमिओच्या झालेल्या धुलाईचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर आज दिवसभर गरगर फिरत राहिला. याबाबत कासेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या घटनेला दुजोरा दिला, मात्र मुलीने तक्रार द्यायला नकार दिल्याचेही सांगितले.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com