शेटफळेतून जाणाऱ्या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत 

नागेश गायकवाड 
Friday, 11 December 2020

अकलूज-दिघंची ते हेरवाड या शेटफळेतून जाणाऱ्या राजमार्ग 153चे काम काही महिन्यापासून अर्धवट स्थितीत बंद आहे. गावातून गेलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी खोलवर चर खोदाई केल्यामुळे अर्धवट स्थितीतील रस्ता धोकादायक बनला आहे.

आटपाडी : अकलूज-दिघंची ते हेरवाड या शेटफळेतून जाणाऱ्या राजमार्ग 153चे काम काही महिन्यापासून अर्धवट स्थितीत बंद आहे. गावातून गेलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी खोलवर चर खोदाई केल्यामुळे अर्धवट स्थितीतील रस्ता धोकादायक बनला आहे. यामुळे ग्रामस्थांना त्रास होत असल्यामुळे त्यांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 

अकलूज-दिघंची ते हेरवाड या राजमार्ग 153 चे दीड वर्षापासून वेगात काम सुरू आहे. राजमार्ग शेटफळेतून गेला आहे. आटपाडी ते शेटफळे पर्यंत रस्ता पूर्ण झाला आहे. रस्त्याच्या कामासाठी दुतर्फा असलेली कच्ची-पक्की बांधकामे अतिक्रमण ठरवून पाडली होती. कामासाठी कंपनीने रस्त्याची पूर्ण खोदाई करून दुतर्फा गटर बांधकामासाठी प्रचंड मोठ्या आणि खोलवर चर खोदाई केली. बांधकामे पाडलेल्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने उर्वरित बांधकामे पाडण्यास 3 डिसेंबर आणि त्यानंतर 15 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ दिली आहे. 

रस्त्याचे काम थांबवण्यास प्रशासन किंवा न्यायालयाचा आदेश नसताना अर्धवट स्थितीत काम बंद ठेवले आहे. रस्ता आणि मोठ्या चर खोदाईमुळे रस्ता धोकादायक आणि अपघाताला निमंत्रण देणारा बनला आहे. वाहनधारकांना कसरत करून ये-जा करावी लागते. गटारीसाठी खोदाई केली चर धोकादायक बनली आहे. दुतर्फा सोदाई केलेली चर बुजवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road work passing through Shetfal is in partial condition