येरळाकाठी वाळू वाहतूक रोखण्यासाठी चरी मारून रस्ते बंद

Is there a guardian on the state highway?
Is there a guardian on the state highway?
Updated on

वांगी : वांगी (ता. कडेगाव) परिसरातून वाहणाऱ्या येरळा नदीतील वाळू चोरीसाठी बैलगाड्यांचा वापर होत असल्याचे वृत्त आज "सकाळ' मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर महसूल प्रशासनाने याची गंभीर दखल घेत संबंधित रस्त्यावर जेसीबी यंत्राने खोलवर चरी मारून रस्ते बंद केले. त्यामुळे नदीकाठावरील शेतकरी आनंदित झाले आहेत. 

कडेगाव तालुक्‍यातील बहुतांश गावांना सुजलाम-सुफलाम करणाऱ्या येरळा नदीतून सध्या बैलगाडीतून वाळू चोरून नदीकाठावर ट्रॅक्‍टर भरण्याचा प्रकार वांगी (ता. कडेगाव) येथे 4 ठिकाणी सुरू होता. यातून दररोज शेकडो ब्रासची वाळूचोरी होत होती. वांगीतील येरळाकाठच्या चिमटा परिसर, शेळकबाव पूल, गणेशनगर आणि साळुंखे वस्ती या ठिकाणावरून दररोज 20 बैलगाड्या वाळूचोरी होत असे. 

सायंकाळी 4 ते रात्री 8 आणि पहाटे 4 ते सकाळी 7 या दरम्यान वाळूचोरीला उधाण येत असे. हे तस्कर नदीतून बैलगाडीतून वाळू काढून काठावर सुमारे 500 फूट अंतरावर ट्रॅक्‍टर भरून विक्री करीत होते. 3 बैलगाड्यांमध्ये 2 ट्रॅक्‍टर भरत. ट्रॅक्‍टरची एक खेप 8 हजाराला विकली जाते. सध्या बांधकामे जोरात सुरू असल्याने येरळेच्या वाळूला मागणी वाढली आहे. परिणामी ती चढ्या भावाने विकली जात आहे. यासाठी दिवसेंदिवस बैलजोडी घेऊन वाळू चोरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. 

बैलांच्या वाळू वाहनावर काय कारवाई करायची? या संभ्रमावस्थेत प्रशासन असल्याने कारवाई होत नसे. मात्र आजच्या बातमीची तातडीने दखल घेत महसूल प्रशासनातील गावकामगार तलाठी दिलीप चौरे, वैभव तारळेकर आणि कोतवाल संजय कदम यांच्या पथकाने यामधील साळुंखेमळा रस्त्यावर जेसीबी यंत्राने खोलवर चर काढून रस्ता बंद केला आहे. 

रस्त्यावर काढलेल्या चरी मुजवून वाळूचोरीचा कोणी प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम संबंधिताना सोसावे लागतील. अशा लोकांवर नजर ठेवण्यासाठी महसूलची यंत्रणा सज्ज आहे. 
- दिलीप चौरे, गावकामगार तलाठी, वांगी 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli farmers oppose Shaktipeeth Expressway
When will Sangli DCC Bank recruitment restart?
Koyna Dam water level July 2026
solapur
Marathi News Esakal
www.esakal.com