esakal | बेळगाव जिल्ह्यातील 'या' मंदिरात चोरी; दीड लाखाचा ऐवज लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

Robbery In Shamnewadi Belgaum Jain Temple

चोरट्यांनी मंदिराच्या समोरच्या दरवाजाच्या बाजूने आत येऊन चौकातील अँगल दाराचे मोठे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तेथे असलेल्या खाबांवरील बंदिस्त दानपेटी कटावणीने काढून लंपास केली. आतील गर्भ देवळाच्या दाराचे कुलूप तोडून गर्भ देवळातील चांदीचा कलश व देवीच्या गळयातील मंगळसूत्र चांदीचे छत्र लांबविले.

बेळगाव जिल्ह्यातील 'या' मंदिरात चोरी; दीड लाखाचा ऐवज लंपास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेडकिहाळ ( बेळगाव ) - शमनेवाडी येथील भरवस्तीत असलेल्या श्री 1008 चंद्रप्रभू भगवान मंदिरात चोरीची घटना घडली आहे. यात भगवान मूर्तीवरील चांदीचे दीड किलोचे छत्र, अर्धा किलो चांदीचा कलश, पद्मावती देवी, ज्वालामालिनी देवींच्या गळ्यातील पाच ग्रॅम सोन्याची दोन मंगळसूत्र, अन्य साहित्यासह मंदिरातील दानपेटी असा दीड लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. ही घटना बुधवारी (ता. 13) रात्री घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, बुधवारी रात्री मंदिर बंद करण्यात आले होते. गुरुवारी (ता. 14) जीन मंदिराचे पंडीत सुरेश उपाध्ये पहाटे 4 वाजता पूजेसाठी गेले असता समोरील दरवाजाचे कुलूप मोडल्याचे व दार उघडे असल्याचे पाहिले. त्यावरून मंदिरात कोणीतरी येऊन गेल्याचे निदर्शनास आले. सुरेश उपाध्ये यांनी पहाटेच मंदिर कमिटी सदस्यांना या घटनेची माहिती दिली. तेंव्हा मंदिर कमिटीचे सदस्यांनी येऊन जीन मंदिरातील घटनेची माहिती घेतली.

बंदिस्त दानपेटी लंपास

चोरट्यांनी मंदिराच्या समोरच्या दरवाजाच्या बाजूने आत येऊन चौकातील अँगल दाराचे मोठे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तेथे असलेल्या खाबांवरील बंदिस्त दानपेटी कटावणीने काढून लंपास केली. आतील गर्भ देवळाच्या दाराचे कुलूप तोडून गर्भ देवळातील चांदीचा कलश व देवीच्या गळयातील मंगळसूत्र चांदीचे छत्र लांबविले. मात्र किंमती मूर्तींना हातही लावलेला नाही. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

जीन मंदिरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या शीतल सुभाष खोत-नर्सण्णावर यांच्या किराणा दुकानाचेही कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. पण याच दरम्यान खोत यांच्या कुत्र्याने भुकुंन परिसराला जागे केल्याने तेथून चोरट्यांनी पळ काढला. गुरुवारी (ता. 14) सकाळी कमिटीतर्फे जीन मंदिरातील चोरीच्या घटनेची माहिती सदलगा पोलिसांनी कळवली.

लागोपाठ दुसऱ्या चोरीमुळे भीती
बेडकिहाळ, शमनेवाडी परिसरात चोऱयांचे प्रमाण वाढले आहे. असाच चोरीचा प्रकार येथे गेल्या आठवडय़ात घडला आहे. गुरूवारी (ता. 7) शमनेवाडी येथील वड्डरगल्लीतील वेंकटेश दुर्गा मंदिरातील दुर्गा देवीच्या गळ्यातील सुमारे दोन तोळयाचे मंगळसूत्र चोरीस गेले आहे. चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.